Breaking News
लोकलच्या मोटरमन केबीनमध्ये बसणार CCTV
मुंबई - मध्य आणि पश्चिम रेल्वेने आता सुरक्षेच्या दृष्टीने मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरु केले आहे. मुंब्रा लोकल दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यास वेगाने सुरुवात केली आहे. मध्य रेल्वेच्या 25 लोकलमध्ये 50 तर पश्चिम रेल्वेच्या 26 लोकलमध्ये 52 सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही यंत्रणेमुळे अपघाताचे नेमके कारण शोधण्यास मदत होणार आहे. मध्य रेल्वेवरील मोटरमन्सचा या यंत्रणेला विरोध होता. मात्र मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाचा सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याच्या कामाला वेग आला आहे.
मध्य रेल्वेवर 168 ट्रेनमध्ये 336 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज असणार आहे. तर सध्या 25 ट्रेनमध्ये कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तर पश्चिम रेल्वेकर 115 ट्रेनमध्ये 230 कॅमेऱ्यांची आवश्यकता असणार आहेत. सध्या 26 ट्रेनमध्ये हे कॅमेरे बसवण्यात आली आहेत. प्रत्येक ट्रेनसाठी सव्वा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर येत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे