Breaking News
इराण-इस्रायल युद्धाचा अदानींना फटका
मुंबई, - इराण-इस्रायल युद्धाचा गौतम अदानींवर मोठा परिणाम होत आहे. गेल्या 10 दिवसांत त्यांची कंपनी Adani Ports चे शेअर्स 10 टक्क्यांनी घसरले आहेत. यामुळे अदानी यांच्या एकूण संपत्तीतही मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत अदानी यांच्या एकूण संपत्तीत 10 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त घट झाली आहे.
गेल्या १० दिवसांत अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (एपीईझेड) चे शेअर्स जवळपास 10 टक्क्यांनी घसरले आहेत. या घसरणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे इराण-इस्रायल हल्ला. गेल्या आठवड्यात इराणने इस्रायलच्या किनारी शहर हैफाला लक्ष्य करून अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. येथे हैफा बंदर हे इस्रायलचे एक मोठे बंदर आहे. यामध्ये गौतम अदानी यांची मोठी गुंतवणूक आहे. जानेवारी 2023 मध्ये अदानींची कंपनी Adani Ports ने इस्रायलच्या गॅडोट ग्रुपसोबत हैफा पोर्टमधील 70 टक्के हिस्सा खरेदी केला. हा करार अंदाजे 1.18 अब्ज डाॅलरमध्ये झाला.
इस्रायलच्या आयातीत हैफा बंदराचा वाटा 30 टक्के आहे. हैफा इस्रायलमध्ये एक मोठा नौदल तळ देखील आहे. या हल्ल्यात हैफा बंदराचे कोणतेही नुकसान झाले नाही आणि कामकाज नेहमीप्रमाणे सुरू आहे. मात्र, गुंतवणूकदारांना भीती आहे की इराणने हैफा बंदरावर हल्ला केला तर बंदराचे मोठे नुकसान होऊ शकते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे