HSRP नंबरप्लेट बनवण्यास अंतिम मुदतवाढ
HSRP नंबरप्लेट बनवण्यास अंतिम मुदतवाढ
मुंबई - राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या गाड्यांना HSRP नंबरप्लेट बसवणे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावण्याची अंतिम मुदत आता पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे.( HSRP number plate deadline) वाहनधारकांना मोठा दिलासा देत, परिवहन विभागाने ही मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यासाठी 30 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली होती. 20 जून रोजी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी एक पत्रक काढत HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठीची मुदत 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.
अनेक ठिकाणी नंबर प्लेट्स मिळायला विलंब होत होता, तर काहींना ऑनलाइन अर्ज करण्यात अडचणी येत होत्या. या सर्व बाबी लक्षात घेऊन यापूर्वी सरकारने HSRP नंबरप्लेट बसविण्यासाठीची मुदत वाढवली होती. अजूनही अनेक वाहनांना ही नंबरप्लेट बसवण्यात आलेली नाहीये. या वाहनांना ही नंबरप्लेट बसविता यावी यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात येत असल्याचे परिवहन आयुक्तांनी म्हटले आहे. वाहनधारकांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता, लवकरात लवकर नजीकच्या अधिकृत फिटमेंट सेंटरवर संपर्क साधावा किंवा संबंधित वेबसाइटवर ऑनलाइन बुकिंग करावी, असे आवाहन परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya