Breaking News
मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शिवेंद्रसिंहराजे भोसले
सातारा - सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाममंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. शताब्दीपूर्व साहित्य संमेलन राजधानी सातारा येथे सर्व जिल्हावासियांच्या सहकार्याने अतिशय देखणे आणि दिमाखदार करुन दाखवू. अभिजात मराठी भाषेच्या उत्सावासाठी देश, परदेशातील सर्व मराठी बांधवांना साताऱ्यात येण्याचे निमंत्रण मी देतो, सर्वांचे स्वागत आम्ही जोरदारपणे करू, असे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी म्हटले.
साताऱ्यात मसाप, शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशन या संस्थांनी मागणी केल्यानुसार साताऱ्यात हे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या दोन्ही संस्थांची संयुक्त बैठक नुकतीच झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव सुचवले त्याला साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, साहित्यिक डॉ. उमेश करंबेळकर यांनी अनुमोदन दिले. यावेळी उपस्थित असलेल्या दोन्ही संस्थांच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांची एकमताने ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे