Breaking News
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कुर्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांना महाआरतीद्वारे अभिवादन
मुंबई - मुंबईतील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना महाआरती अर्पण करून विनम्र अभिवादन केले. कुर्ला पश्चिम येथील संत गाडगे महाराज शाळेत हे ऐतिहासिक मंदिर माजी खासदार पूनम ताई महाजन यांच्या पुढाकारातून साकारण्यात आले असून, हा सोहळा अत्यंत भक्तिभावपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडला. या प्रसंगी माजी खासदार पूनम ताई महाजन, आरटीआई कार्यकर्ता अनिल गलगली, मुंबई भाजपा प्रवत्ते उदय प्रताप सिंह, प्रकाश चौधरी तसेच अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar