राष्ट्रीय चर्मकार संघाची रविवारी धारावीत संवाद परिषद
राष्ट्रीय चर्मकार संघाची रविवारी धारावीत संवाद परिषद
मुंबई - चर्मकार समाजात ढोर,चांभार, मोची,हरल्या,मादिगा अशा अनेक जाती, पोट जाती देशात असून या जातींचे,समाज स्तरावर प्रतिनिधित्व करणारे प्रमुख प्रतिनिधी,पदाधिकारी आणि या समाजातील सर्व प्रमुख नेत्यांची एक संवाद परिषद येत्या रविवारी सकाळी १०.३० वा. पासून धारावीमधील मनोहर जोशी महाविद्यालयात होणार आहे.ही संवाद परिषद राष्ट्रीय चर्मकार संघाने या संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी आमदार बाबुराव माने यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे.
या परिषदेस समाजातील प्रमुख उद्योजक, व्यापारी,वकिल,डाॅक्टर,इंजिनियर, कवी,लेखक, पत्रकार आणि समाज कार्यकर्ते अशा सर्वांनाच या बैठकीस आमंत्रित केले आहे.
आपला सगळ्यांचा निकटचा संबंध हा चामड्याशी आहे.यामुळे आपल्या समाजात पोटजाती नाहीत.सगळ्यांची जात एकच आहे.ती आहे चर्मकार. संत रोहिदास महाराज यांचा आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांच्या वाटेने चालणारी आमचा राष्ट्रीय चर्मकार संघ आहे.हा संघ वेळोवेळी समाजात वैचारिक स्तरावर संवाद बैठका घेत असतो त्याला अनुसरूनच ही परिषद होणार असल्याचे बाबुराव माने यांनी सांगितले.
या परिषदेत समाज ऐक्याला बळकटी देणे,समाज बांधवांनी चर्म उद्योगांसाठी राज्य शासनाच्या लिडकाॅम मार्फत घेतलेली कर्जे माफ करण्याची मागणी,शहरी- ग्रामीण चर्मकार व्यावसायिकांना व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यांचे निवारण,शेतकऱ्यांच्या धर्तीवर आपत्ती काळात चर्मकार व्यावसायिकांनाही कर्ज माफीचे धोरण लागू करावे ही मागणी आदी प्रमुख मुद्द्यांवर या संवाद परिषदेत समाजातील प्रमुख धुरीण हे चर्चा करतील.यानंतर या मुद्द्यांचा विचार करुन समाजाच्या सर्वागिण विकासासाठी एक निश्चित धोरण बनवतील,असे या संवाद परिषदेचे आयोजक बाबुराव माने यांनी स्पष्ट केले आहे.
या संवाद परिषदेस राष्ट्रीय चर्मकार संघाचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत दळवी, महिला प्रदेशाध्यक्ष मीराताई शिंदे, मुंबई प्रदेशाध्यक्ष विलास गोरेगांवकर,मुंबई महिला प्रदेशाध्यक्षा प्रा.शारदाताई नवले, मुंबई प्रदेश महासचिव गणेश खिलारे,मच्छगार समाजाचे अध्यक्ष अॅड सिध्दनाथ हर्तरकर,परशुराम इंगोले, प्रा.चंद्र प्रकाश देगलुरकर, अशोकराव आगवणे,शाहीर संभाजी भगत, अॅड रमेश हंकारे आदी समाज बांधव ,समाज नेते पदाधिकारी व प्रतिनिधी यावेळेस उपस्थित राहणार आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar