बीडीडी चाळ, पत्राचाळ पुनर्विकासाला गती; म्हाडाचा नवा आराखडा
बीडीडी चाळ, पत्राचाळ पुनर्विकासाला गती; म्हाडाचा नवा आराखडा
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे आज म्हाडाच्या विविध प्रकल्पांच्या आणि अधिनियमांतील सुधारणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये बीडीडी चाळ पुनर्विकास योजनेसह मुंबईतील विविध वसाहती व प्रकल्पांचा प्रगतीचा समावेश होता. म्हाडाच्या अधिनियमांतर्गत सुधारणा करताना बांधकाम परवानगीसाठी आकारण्यात येणाऱ्या विकास शुल्कावरील दंडनीय व्याजाचा दर कमी करण्याचा तसेच अतिरिक्त क्षेत्रफळाचा वापर संक्रमण शिबिरासाठी किंवा सोडतीद्वारे विक्रीसाठी करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली.
विनिमय 33(4), 33(5), 33(7), 33(9) आणि 33(24) अंतर्गत सुचवलेल्या सुधारणांवर सकारात्मक विचारविनिमय करण्यात आला.
वरळी बीडीडी चाळीत 9869 पुनर्वसन सदनिकांपैकी 3888 सदनिकांचे काम प्रगतीपथावर असून त्यापैकी 556 सदनिकांचे हस्तांतरण येत्या दोन आठवड्यांत होणार आहे. 1419 सदनिका सप्टेंबर 2025 पर्यंत आणि 1642 सदनिका ऑगस्ट 2027 पर्यंत हस्तांतरित होणार आहेत. नायगाव बीडीडी प्रकल्पात 3344 पैकी 1938 सदनिकांचे काम सुरू असून त्यातील 864 सदनिका सप्टेंबर 2025 मध्ये देण्यात येणार आहेत.
ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीत 1241 सदनिकांचे काम सुरु असून त्यातील 342 सदनिका डिसेंबर 2025 पर्यंत हस्तांतरीत होणार आहेत. गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर पत्राचाळ प्रकल्पातील मूळ 672 सभासदांना सदनिकांचे हस्तांतरण पूर्ण झाले असून 1243 नवीन सदनिकांसाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत.
तसेच, सुरभी गृहनिर्माण संस्था, पोलीस वसाहती, आराम नगर, मोतीलाल नगर, अभुदय नगर, वांद्रे रिक्लेमेशन, आदर्शनगर, जीटीबी नगर सायन कोळीवाडा, पीएमजीपी वसाहत, पूनम नगर आणि मुंबई महानगर ग्रोथ हब या प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री यांनी म्हाडाने अधिक परिणामकारक आणि नागरिकांना परवडणाऱ्या गृहनिर्माण संधी निर्माण करण्यासाठी त्वरित व योग्य सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya