Breaking News
आदिशक्ती संत मुक्ताई च्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
जळगाव – संत मुक्ताई पालखीचे पंढरपूरकडे आज 6 जूनला प्रस्थान झाले असून 28 दिवसांत सहा जिल्ह्यांतून 600 किमी प्रवास करत पालखी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला पोहोचणार आहे. सजवलेला रथ आणि संत मुक्ताबाईच्या चांदीच्या पादुका या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते. हजारो वारकरी, महिला या पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी झाल्या असून राम कृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम या जयघोषाने मुक्ताईनगर परिसर दुमदुमल्याचे पाहायला मिळाले.
संत मुक्ताईंच्या आषाढी वारीचे यंदाचे ३१६ वे वर्ष आहे. कोथळी येथील संत मुक्ताईंच्या मूळ मंदिरातून पालखी वारीचा पंढरपूरच्या दिशेने प्रवास सुरू झाला असून या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थांनतर्फे आज विविध कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते. पालखी प्रस्थान सोहळ्याच्या अगोदर आदिशक्ती मुक्ताई च्या जुन्या मंदिरात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते आरती व पूजन करण्यात आले तर आदिशक्ती मुक्ताईच्या पालखीच्या रथाचे सारथ्य विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी केल्याचे पाहायला मिळाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar