Breaking News
प्रथम या राज्यांमध्ये होणार जातीय जनगणना
नवी दिल्ली - केंद्र सरकार १ मार्च २०२७ पासून देशात जातीय जनगणना करणार आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या चार डोंगराळ राज्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून जातीय जनगणना प्रथम केली जाईल. या राज्यांमध्ये १ ऑक्टोबर २०२६ पासून ती सुरू होईल. देशातील शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती. भारतात दर १० वर्षांनी जनगनणा केली जाते. त्यानुसार, पुढील जनगणना २०२१ मध्ये होणार होती, परंतु कोविड-१९ साथीच्या आजारामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.
देशात आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली. सरकार जातनिहाय जनगणना करु शकत नाही, असं प्रतिज्ञापत्र सरकारने सुप्रीम कोर्टात यापूर्वी सादर केलं होतं. आता, केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय कसा झाला, बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. मात्र, केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे