Breaking News
अमेरिकेच्या FDA ने नागरिकांना दिला टोमॅटो न खाण्याचा सल्ला
अमेरिकेच्या अन्न नियामक संस्थेने (अन्न आणि औषध प्रशासन) टोमॅटोमध्ये ‘साल्मोनेला’ नावाचा धोकादायक जीवाणू असल्याचं म्हटल असून अमेरिकेतील अनेक राज्यांमधून टोमॅटोचा संपूर्ण माल परत मागवण्यात आला आहे. साल्मोनेला बॅक्टेरियाने संक्रमित टोमॅटो आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकतात. यामुळे उच्च ताप, पोटदुखी, उलट्या, अतिसार आणि डिहायड्रेशनसारख्या समस्या उद्भवू शकतात, अशी माहिती एफडीएच्या अहवालात देण्यात आलीय मुले, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना सर्वाधिक धोका असतो. 28 मे रोजी एफडीएने या संसर्गावर उच्चस्तरीय इशारा जारी केला. याचे गांभीर्य ओळखून त्याला वर्ग-1 श्रेणीत ठेवले गेले. कोणत्याही अन्न उत्पादनासाठी सर्वात गंभीर इशारा मानला जातो.
सीडीसी म्हणजेच सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार, साल्मोनेलाचा संसर्ग हे अन्न विषबाधाचे प्रमुख कारण आहे. त्याचे जीवाणू उष्ण आणि कोरड्या वातावरणात आठवडे आणि ओलावा किंवा फ्रीजरमध्ये महिने टिकू शकतात. म्हणूनच एफडीएने लोकांना संक्रमित टोमॅटो वापरण्यास मनाई केली आहे.
अमेरिकेची गणना जगातील सर्वात मोठ्या टोमॅटो उत्पादक देशांमध्ये होते. येथे 20 हून अधिक राज्यांमध्ये टोमॅटोची लागवड केली जाते. ज्यामध्ये फ्लोरिडा आणि कॅलिफोर्निया हे सर्वात मोठे केंद्र आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे