Breaking News
उत्पादन खर्च निघत नसल्याने 400 मोसंबीची झाडं जेसीबीने तोडली.
जालना :– जालन्यात 2 एकरावरील मोसंबी बागेवर शेतकऱ्याने जेसीबी फिरवला आहे. मोसंबीतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने त्रस्त शेतकऱ्याने आपली 400 मोसंबीची झाडं जेसीबीने नष्ट केली. जालन्याच्या उटवद येथील शेतकरी अविनाश गव्हाळे यांनी त्यांच्या दोन एकरावरील शेतात 400 मोसंबीची झाडं लावली होती. परंतु, मोसंबी बागेवर केला जाणारा 50 ते 60 हजारांचा खर्चही मोसंबी उत्पादनातून निघत नसल्याने गव्हाळे यांनी आपल्या 2 एकरावरील मोसंबीची तब्बल 400 झाडं जेसीबीने तोडून टाकली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे