Breaking News
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्प’चे अनवारण संपन्न
नाशिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहरातील पोलीस उपायुक्त कार्यालय, झोन-१ नाशिक येथील ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनावरण करण्यात आले.
यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त नाशिक संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन जाधव, कारागीर मोतीराम पवार, लक्ष्मण आतारकर, पोलीस शिपाई विशाल पवार यांच्यासह पोलीस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
सामान्य माणूस व पोलीस यांच्यातील संबंध अधिक दृढ व्हावेत, अशी कॉमन मॅन-पोलीस शिल्पाची संकल्पना आहे. या शिल्पाच्या सुशोभीकरणासाठी बसविण्यात आलेला दगड घडविण्याचे श्री.पवार व श्री.आतारकर यांनी केले आहे
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar