NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

ख्रिश्चन समाजावरील अत्याचार थांबवा, व राजकीय प्रतिनिधित्व, स्वतंत्र महामंडळ द्या -पी विल्सन

ख्रिश्चन समाजावरील अत्याचार थांबवा, व राजकीय प्रतिनिधित्व, स्वतंत्र महामंडळ द्या -पी विल्सन

पुणे - देशात ख्रिस्ती समाजावर दिवसागणिक अत्याचार वाढत आहेत =, संविधानिक हक्काचा भंग काही जातीवादी शक्ती करीत आहे,   मणिपूर चा प्रसंग, फा. स्टेन वरील अन्याय, चर्च वर होणारे हल्ले, ख्रिस्ती शाळा,पास्टर यांवर होणारे हल्ले निषेधार्ह आहेत. असे सांगत अल्पसंख्याक आयोगाला खऱ्या अर्थाने जागे करावे लागेल, महाराष्ट्र राज्यतिल ख्रिस्ती बांधवाना राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यासाठी प्रयत्न करणार, व लवकरच राष्ट्रीय पातळीवर समिती बनवणार असल्याचे द्रुमकचे राज्यसभा खासदार पी विल्सन  यांनी सांगितले.  तसेच  दलित ख्रिस्चनाना सवलती संविधानाच्या आधारे मिळाल्या पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली. 

रिजनल ख्रिस्ती सोसायटीच्या वतीने प्रशांत (लुकास) केदारी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित सहाव्या ख्रिस्ती हक्क परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी खासदार पी. वील्सन बोलत होते.  हक्क परिषदेच्या अध्यक्षस्थानी  दिलीप नाईक होते. याप्रसंगी पुणे प्रांताचे धर्मगुरू फा. रॉक अल्फानसो, पा. पिटर जॉर्ज, सतिश मेहेंद्रे, आमदार बापूसाहेब पठारे,सिस्टर दिव्या,फा. विजय नायक, माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे,जॉन फर्नांडिस,फा. जो गायकवाड,रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, मुस्लिम कॉन्फरन्स चे अध्यक्ष. झुबेर मेमन, आप पक्षाचे सुदर्शन जगदाळे,सामाजिक कार्यकर्ते हुलगेश चलवादी,फेबियणं सॅमसन,खिसाल जाफरी,राजेश केळकर, समुईल सांडीराज, प्रियंदर्शनी,उद्योजक नितीन काळे, शिरीष हिवाळे, ख्रिस्ती लीगल असोसिएशन चे ऍड.बाजीराव दळवी यांनी मूलभूत हक्का विषयी माहिती दिली,पा.पद्माकर, विल्सन भोसले, पा. सुधीर साबळे, स्टीवेन गोडे,सत्यवान गायकवाड, फा.रोलँड व समाजातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, संघटना प्रमुख उपस्थित होते.

प्रास्ताविकपर भाषणात प्रशांत(लुकास) केदारी यांनी समाजावर होणाऱ्या अत्याचाराची दाहकता मांडली,राज्यस्तरीय सुरक्षा समिती,राजकीय प्रतिनिधित्व द्यावे, ख्रिस्ती समाजाला महामंडळ दयावे अशी अग्रही मागणी केली,समाजावर खोटे गुन्हे दाखल केले जातात व समाजाची बदनामी करणे समाज कंटकांनी थांबवावे असे प्रतिपादन केले,

खासदार पी.विल्सन यांनी संपूर्ण भारतात कशा प्रकारे खोटे धर्मातरनाचे गुन्हे टाकले जातात, अत्याचार हा दिवसागणिक वाढत आहे, संविधानिक हक्काचा भंग काही जातीवादी शक्ती करीत आहे, त्याच वेळी मणिपूर चा प्रसंग, फा. स्टेन वरील अन्याय, चर्च वर होणारे हल्ले, ख्रिस्ती शाळा,पास्टर यांवर होणारे हल्ले याचा निषेध केला, तसेच अल्पसंख्याक आयोगाला खऱ्या अर्थाने जागे करावे लागेल असे परखडपणे सांगितले, महाराष्ट्र राज्यतिल ख्रिस्ती बांधवाना राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यासाठी प्रयत्न करणार, व लवकरच राष्ट्रीय पातळीवर समिती बनविणार असे सांगितले, दलित ख्रिस्चनाना सवलती संविधानाच्या आधारे मिळाल्या पाहिजे असेही ते म्हणाले.

परिषदेचे अध्यक्ष दिलीप नाईक यांनी समाजात ऐक्य निर्माण होण्यासाठी उपाय योजना प्रभावी केल्या पाहिजे असे सुचविले, राजकीय प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी राज्यस्तरीय चळवळ उभी करण्याचा मानस त्यांनी केला व लवकरच ख्रिस्ती समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजिले जाईल असे त्यांनी सांगितले,

फा.जो गायकवाड यांनी बांधवांची समाजातील सबलिकरणाची भूमिका मांडली, पा. पिटर जॉर्ज यांनी सुरुवातीची प्रार्थना केली, पा. केळकर यांनी समाजावरील अत्याचारला न्याय मिळण्यासाठी समिती स्थापन व्हावी असे सांगितले

आमदार बापूसाहेब पठारे यांनी ख्रिस्ती समाजाला वडगावशेरीत किंवा पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मदत करू, तसेच सांस्कृतिक भवन व आर्थिक विकास महामंडळ मिळवून देऊ असे आश्वासन दिले, माजी उप महापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी परिषदेला संपूर्ण पाठींबा जाहीर केला, राहुल डंबाळे यांनी आंबेडकरी चळवळ ख्रिस्ती समाजाला संपूर्ण सहकार्य देईल व त्यांचे मूलभूत हक्क अबाधित राहावे यासाठी मदत करेन असे निक्षुन सांगितले,हाजी झुबेर मेमन यांनी परिषदेला शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री दत्ता भरणे यांनी परिषदेला ऑनलाईन पद्धतीने शुभेच्छा दिल्या व ख्रिस्ती समाजाचे प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले, बिशप थॉमस डाबरे यांनी ऑनलाईन शुभेच्छा संदेश दिला. हुलगेश चलवादी म्हणाले ख्रिस्ती समाज हा शांतता प्रिय आहे, त्याचे भारतीय शिक्षण व्यवस्थेत मोठे स्थान आहे म्हणून त्यांना डावलून चालणार नाही,या परिषदेला पुण्यातून व राज्यातून सर्व प्रतिनिधी, अल्पसंख्यांक नेते सहभागी झालें होते.

ख्रिश्चन समाजातील सामाजिक कार्य करणारे साहित्यिक नरेश चव्हाण, लोरेन्स गायकवाड यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.एस एफ एस मराठी संघटना, यावे निस्सी ख्रिश्चन संघटना, प्रेषित फॉउंडेशन,विनोद तोरणे यांच्या संघटनेचा सत्कार करण्यात आला,दीपक चक्रनारायण यांच्या गरीब मुलांच्या अनाथालय कार्यासाठी सत्कार करण्यात आला, प्रगत पदवीधर संघटना, रेंज हिल्स ख्रिश्चन युथ संघटना यांचा पी. विल्सन व सतिश मेहेंद्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, ऍड.अँतोन कदम यांनी धर्मांतरित ख्रिस्चनाना सवलती मिळाल्या पाहिजे असे सूचित केले, जॉन मनतोडे यांनी सूत्र संचालन केले.

रिजनल ख्रिश्चन सोसायटी च्या महिला पदाधिकारी मेरी पार्गे, सलूमी तोरणे, संगीता केदारी, संगीता पापानी, प्रतिमा केदारी, शितल गायकवाड, मेरी जॉन्सन यांनी व सुधीर शिरसाठ,पिटर भोसले, नितीन भोसले,अरुण केदारी, दिलीप घुटे, पा. मुरली नायर,विनोद तोरणे, रॉकी डिसूझा,सॅमसन, जॉन केदारी,राजकुमार सतराळकर, मार्कस पंडित, जॉन फर्नांडीस, एडवीन, रवींद्र कांबळे, पॉल तोरणे यांनी स्वयंसेवकांचे कार्य केले मारियादास तेलोरे यांनी सर्वांचे आभार मानले.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट