आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अविनाश साबळेने जिंकले सुवर्णपदक
आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अविनाश साबळेने जिंकले सुवर्णपदक
भारतीय धावपटू अविनाश साबळेने काल आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. त्याने ८:२०.९२ सेकंद वेळ नोंदवत ३६ वर्षांनंतर भारताला या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले. दक्षिण कोरियातील गुमी येथे आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ सुरू आहे.भारताने या स्पर्धेत शेवटचे सुवर्णपदक १९८९ मध्ये जिंकले होते, तेव्हा दिना रामने ही कामगिरी केली होती. १९७५ मध्ये, हरबहाल सिंग स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला.
.दक्षिण कोरियातील गुमी येथे झालेल्या अजिंक्यपद स्पर्धेत विजय मिळवल्यानंतर साबळे म्हणाला, “या प्रदेशात मी सर्वोत्तम असल्याने मला सुवर्णपदक जिंकण्याचा आत्मविश्वास होता.”ज्योतीनेही सुवर्णपदक जिंकलेज्योती याराजीने १०० मीटर अडथळा शर्यत फक्त १२.९६ सेकंदात पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले. ज्योतीचा मागील विक्रम १२.९९ सेकंदांचा आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar