Breaking News
मंत्रालय परिसरात मेट्रो प्रशासनाने लावलेली झाडे सुकली, निसर्ग प्रेमी नाराज
मुंबई - मेट्रो प्रशासनाने मोठा गाजावाजा करत आम्ही मित्र प्रशासनासाठी तोडलेली झाडे त्वरित त्या ठिकाणीच लावणार त्यामुळे मुंबईतील झाडाचा समतोल राखणार आणि निसर्गाला कुठेही धोका पोहोचणार नाही असे आश्वासन दिले होते. परंतु आता अनेक मेट्रोचे टप्पे सुरू झाले असून मेट्रोचे अनेक कामे संपुष्टात आले आहेत. परंतु मेट्रो प्रशासनाने मंत्रालय परिसरात लावलेली अनेक झाडे सुकलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहेत. तसेच काही झाडे तुटलेल्या अवस्थेत असून त्याची पाने तुटलेल्या अवस्थेत असून जमिनीवर पडलेली पाहायला मिळत आहे. मंत्रालय परिसरात आंबा, जांभळे, पिंपळ, लिंबाचे झाड, नारळ अशा विविध जातीची झाडे होती. परंतु जेव्हा मेट्रो प्रशासनाचे काम सुरू झाले तेव्हा मेट्रो स्टेशनच्या रुंदी करण्यासाठी ही सगळी झाडे तोडण्यात आली. तोडलेल्या सगळ्या झाडाच्या जागी नवीन झाडे लावण्याचे आश्वासन मेट्रो प्रशासनाने दिले होते परंतु हे आश्वासन फक्त आश्वासन राहिले असून त्या जागी लावलेली बहुतेक झाडे ती सुकलेल्या अवस्थेत असून काही झाडे उनमळून पडलेली आहेत. याबाबत आम्ही मेट्रो प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करत आहे परंतु मेट्रो प्रशासन आम्हाला काही दाद देत नाही. जर लवकरात लवकर या ठिकाणी नवीन झाडे लावण्यात आली नाही. याबाबत आम्ही मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांना देखील पत्र व्यवहार केला आहे. जर लवकरात लवकर या ठिकाणी नवीन झाडे लावण्यात आली नाहीत तर आम्ही तीव्र आंदोलन करू अशी माहिती आहे निसर्गप्रेमी रवींद्र जाधव यांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे