निवडणूक आयोगाकडून चार राज्यांतील मतदार अधिकार्यांचे प्रशिक्षण सुरु
निवडणूक आयोगाकडून चार राज्यांतील मतदार अधिकार्यांचे प्रशिक्षण सुरु
राजकीय
मुंबई:– भारत निवडणूक आयोगाच्या (ECI) अंतर्गत इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमॉक्रसी अॅण्ड इलेक्शन मॅनेजमेंट (IIIDEM), नवी दिल्ली येथे आज मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) पर्यवेक्षकांसाठीच्या आठव्या तुकडीचे प्रशिक्षण सुरु झाले. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमातील छत्तीसगड, हरियाणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथील BLO, BLO पर्यवेक्षक आणि मतदार नोंदणी अधिकार्यांना संबोधित केले.
IIIDEM येथे आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या प्रशिक्षण बॅचमध्ये एकूण ३७३ अधिकारी सहभागी झाले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशमधून ११८, मध्य प्रदेशमधून १३०, छत्तीसगडमधून ९६ आणि हरियाणामधून २९ अधिकार्यांचा समावेश आहे. गेल्या दोन महिन्यांत, दिल्ली येथे एकूण ३,७२० फील्ड अधिकार्यांचे प्रशिक्षण ECI मार्फत घेण्यात आले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले की, हे प्रशिक्षण अत्यावश्यक असून, लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० व १९५१, मतदार नोंदणी नियम १९६०, निवडणूक आचारसंहिता नियम १९६१ आणि वेळोवेळी आयोगाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांनुसार निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे आहे.
ते पुढे म्हणाले की, या प्रशिक्षणाद्वारे सहभागी अधिकारी अंतिम मतदार यादी प्रकाशित झाल्यानंतर जिल्हाधिकारी/कार्यकारी दंडाधिकारी (कलम २४(अ)लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५०) व राज्य/केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य निवडणूक अधिकारी (कलम २४(ब)) यांच्याकडे पहिल्या व दुसऱ्या अपीलच्या तरतुदींची माहिती मिळवतील. तसेच, BLO व BLO पर्यवेक्षकांनी फिल्डमध्ये काम करताना मतदारांनाही या तरतुदींची जाणीव करून द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SSR) मोहिमेनंतर दिनांक ६ ते १० जानेवारी २०२५ दरम्यान छत्तीसगड, हरियाणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधून एकही अपील दाखल झालेले नाही.
या प्रशिक्षणाचा उद्देश सहभागी अधिकार्यांना मतदार नोंदणी, अर्ज प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि फिल्डमध्ये निवडणूक प्रक्रियेची अंमलबजावणी याबाबत व्यावहारिक ज्ञान देणे आहे. त्यांना माहिती व तंत्रज्ञान साधनांचा वापर, तसेच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रणांचे तांत्रिक प्रात्यक्षिक आणि मॉक पोल्सच्या माध्यमातून प्रशिक्षणही दिले जाणार आहे, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकानुसार कळविले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya