Breaking News
महिला आयोगाच्या अध्यक्षांविरोधात महिला आयोगातच तक्रार दाखल
पुणे, दि. २७ : वैष्णवी हगवणे प्रकरणात महिला आयोगाचा गलथान कारभार समोर आल्यानंतर आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. हगवणे कुटुंबातून आधीच तक्रार झाली होती, तेव्हाच कार्यवाही केली असती तर वैष्णवी आज हयात असती, असे सांगत विरोधकांनी रुपाली चाकणकर यांना झोडपून काढले आहे. आता तर महिला आयोगात अध्यक्षा चाकणकर यांच्याविरोधातच तक्रार दाखल झाली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या संगीता भालेराव यांनी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात महिला आयोगात तक्रार दाखल केली असून त्यांच्यापासून जीविताला धोका असल्याचे भालेराव यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सोनाली गाडे आणि स्नेहल चव्हाण यांच्याविरोधातही भालेराव यांनी तक्रार दाखल केली आहे.
संगीता भालेराव म्हणाल्या, चाकणकर यांनी महिला आयोगाचे अध्यक्षपद मुक्त करावे, असे मी फेसबुकवर लिहिले. मयुरी हगवणेची तक्रार निकाली काढली असती तर आज आपल्याला वैष्णवी हयात दिसली असती. यात मी काहीही आक्षेपार्ह लिहिलेले नव्हते. चाकणकर यांच्याकडे महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदही आहे. त्यामुळे मुख्य कामाकडे त्यांचे दुर्लक्ष होत असावे, अशा हेतूने मी पोस्ट लिहिली होती. ज्या व्यक्तीला कायद्याचे ज्ञान आणि सामाजिक भान आहे, अशा व्यक्तीकडे महिला आयोगाचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी मी पोस्टमधून केली होती
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar