Breaking News
गुजरातला उद्योग हलवून महाराष्ट्रात रोजगार कसा देणार ?
मुंबई - मोदी सरकारने महाराष्ट्रातील इंटरनॅशनल फायनान्स सेंटर, मरीन अकादमी, बल्क ड्रग पार्क, डायमंड बोर्सपासून, फॉक्सकॉन, टाटा एअरबससारखे प्रचंड रोजगार देणारे प्रकल्प महाराष्ट्राकडून हिरावून गुजरातला नेले असता महायुतीने आपल्या जाहिरनाम्यात 25 लाख रोजगार देण्याचे आश्वासन कसे दिले आहे, असा खडा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते, माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केला आहे.
महाराष्ट्राचा राज्य उत्पन्नाचा वाटा दोन टक्क्यांनी घसरला आहे तर गुजरातचा वाटा हा ७ टक्क्यांनी वाढला आहे असे गाडगीळ यांनी दर्शनास आणून दिले आहे. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत दोन कोटी रोजगार देण्याच्या आणि वल्गना करणाऱ्या मोदी सरकारच्या गेल्या ७ वर्षात तब्बल ५० लाख नोकऱ्या गेल्या आहेत ही आकडेवारी का झाकून ठेवल्या जात आहे असा सवालही गाडगीळ यांनी केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar