Breaking News
Toyota कंपनीच्या विविध कार्सवर मोठी सूट
ट्रेण्डिंग
मुंबई - कार उत्पादक टोयोटा कंपनीने आपल्या अनेक कारवर सूट दिली आहे. ज्यात अर्बन क्रूज़र हाइडर, हिलक्स, ग्लैंजा आणि इतर कारचा समावेश आहे. याशिवाय टोयोटा फॉर्च्युनरवरही भरघोस सूट देण्यात आली आहे. टोयोटाच्या अनेक वाहनांवर 5 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे.
टर्बो-पेट्रोल इंजिन असलेल्या टोयोटाच्या टोयोटा अर्बन क्रूजर टैसर मॉडेलच्या महागड्या मॉडेलवर सुमारे 65 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. टोयोटाच्या या एसयूव्हीमध्ये 1.2 लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड इंजिन आहे. यासोबतच यात 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देखील आहे. टोयोटाच्या देशांतर्गत कारची किंमत ही सुमारे 7.74 लाख रुपयांपासून 13.04 लाख रुपयांपर्यंत आहे.
टोयोटा ग्लेंजा या कारवर 68 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. टोयोटा ग्लैंजाची किंमत 6.39 लाख रुपयांपासून सुरु होते आणि 9.69 लाखांपर्यंत जाते. हे कार 1.2 लीटर पेट्रोल इंजिनसह येते. जे 88.05 bhp पॉवर जनरेट करते. टोयोटा अर्बन क्रूज़र हायराइडर या कारवर 75 हजार रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. या टोयोटा कारची सुरुवातीची किंमत ही सुमारे 11.14 लाख रुपये असून ती 20.19 लाख रुपयांपर्यंत आहे. ही टोयोटा कार 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, वाहन स्थिरता नियंत्रण, ऑटोमॅटिक क्लायमेंट कंट्रोल, 9 इंट टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जर, हेड-अप डिस्प्ले, ॲम्बीयंट इंटीरियर लाइटिंग तसेच 7 इंच डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टरसह येते.सर्वात लोकप्रिय असणारी टोयोटा हाइलक्सवर 5 लाख रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. काही डीलर्स याहूनही जास्त सूट देत आहेत. या टोयोटा कारची किंमत सुमारे 30.40 लाख ते 37.90 लाख रुपये आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे