Breaking News
RBI 90- QUIZ मधून 10 लाख रुपये जिंकण्याची संधी
मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पदवीपूर्वी स्तरावरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी RBI 90 क्विझ सुरु केली आहे. RBI च्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. यामध्ये सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्न असतील. ही परीक्षा ऑनलाईन असेल. स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा आयोजीत करण्यात येणार आहे. तर अंतिम फेरीत सर्व राज्यातील विजेते असतील.
20 ऑगस्ट 2024 रोजी RBI90Quiz ऑनलाइन प्लॅटफ़ॉर्म लाँच करण्यात आला आहे. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता आणि भारतीय रिझर्व्ह बँकेविषयी जागरुकता आणण्यासाठी मदत करणार आहे. भारतीय तरुणांमध्ये आर्थिक साक्षरतेसह डिजिटल उत्पादन आणि डिजिटल आर्थिक व्यवहाराविषयीची जागरुकता वाढवण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. RBI 90 क्विझ कार्यक्रमात भाग घेणाऱ्या संघाना विविध स्तरावर आकर्षक पुरस्कार जिंकण्याची संधी देण्यात येणार आहे.
बक्षिसाचे स्वरूप
पहिला पुरस्कार 10 लाख रुपयांचा आहे. त्यानंतर दुसरा पुरस्कार 8 लाख तर तिसरा पुरस्कार 6 लाख रुपयांचा आहे. विभागीय स्तरावर पहिले बक्षिस 5 लाख, त्यानतंर दुसरे बक्षीस 4 लाख तर तिसरे बक्षीस 3 लाख रुपयांचे आहे. तर राज्यस्तरावर पहिले बक्षिस 2 लाख दुसरे बक्षीस 1.5 लाख आणि तिसरे बक्षीस 1 लाख रुपये आहे. स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा आयोजीत करण्यात येणार आहे. तर अंतिम फेरीत सर्व राज्यातील विजेते असतील. त्यातून पहिला, दुसरा आणि तिसऱ्या पुरस्काराचे मानकरी राष्ट्रीय स्तरावर ठरवले जातील.
सहभागी होण्यासाठी पात्रता
RBI90Quiz मध्ये पदवीपूर्व विद्यार्थ्यांचा सहभाग असेल. ज्याचे वय 1 सप्टेंबर, 2024 रोजी 25 वर्षांपेक्षा कमी असेल म्हणजे ज्यांचा जन्म 01 सप्टेंबर 1999 रोजी अथवा त्यानंतर झाला असेल ते या स्पर्धेत भाग घेऊ शकतील. भारतीय महाविद्यालयात कोणत्याही शाखेत शिकणारे विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेऊ शकतील. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar