मुंबई (ऋषिकेश तटकरे) : "तीन पिढया क्रिकेट स्पर्धांच्या निमित्ताने मैदानात उतरून क्रीडासंस्कृतीचे जतन करताना पाहाताना खूप बरं वाटतंय" अभ्युदनगर प्रथमेश सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सहकार्याने इमारत क्र १० च्या पटांगणात "प्रथमेश चषक" आयोजित करण्आंयात आला होता. आंतरभ्युदयनगर क्रिकेट स्पर्धेनिमित पाहुणे म्हणून बोलताना नगरसेवक सचिन पडवळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विनोद साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या स्पर्धेसाठी नगरसेवक दत्ता पोंगडे शाखाप्रमुख जयसिंग भोसले, विभागातील सुप्रसिद्ध डॉ. प्रागजी वाझा, डॉ. वैशाली शेलार, महापालिकेतील डॉ. दीपक व तरुण मित्र नवरात्र उत्सव मंडळ यांनी सदिच्छा भेट देऊन आयोजक आणि खेळाडूंचे कौतुक केले. इमारत क्र. ३९ च्या संघाने बाजी मारत चषकाचे मानकरी होण्याचा मान मिळवला तर इमारत क्र. १७ च्या उपविजेता याचा मान मिळवला.
रिपोर्टर
ऋषिकेश तटकरे
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे