दरवर्षी गाव जलमय होत असल्याने डुंगी ग्रामस्थ आक्रमक
सिडकोच्या चुकीच्या नियोजनाचा फटका ; आंदोलनाचा इशारा
पनवेल ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सिडकोमार्फत सुरु आहे. सिडकोच्या चुकीच्या नियोजनामुळे दरवर्षी डुंगी गावात पाणी शिरते. याचा फटका ग्रामस्थांना बसत असल्याने गावकरी संतप्त झाले आहेत. गेल्या चार दिवस पडणार्या मुसळधार पावसाने डुंगीगाव जलमय झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी निधी चौधरी, तहसीलदार, सिडको आणि पोलीस अधिकारी यांच्यासोबत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच इतर मान्यवरांची मंगळवारी (दि. 20) प्रांत कार्यालयात बैठक झाली.
विमानतळासाठी सिडकोने परिसरातील गावांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. तसेच परिसरातील नदीचा प्रवाह वळविला असल्याने पावसाचे पाणी जाण्यास पर्यायी मार्ग नसल्याने डुंगी गाव आजच्या घडीला जलमय झाले आहे. सिडकोच्या चुकीच्या नियोजनामुळे दरवर्षी गावात पाणी साचत आहे. गेले चारवर्षापासून ही परिस्थिती असूनही कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही. तसेच नुकसान भरपाईही दिली जात नाही. विमानतळासाठी सिडकोने नदीचा नैसर्गिक प्रवाह वळविला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जाण्यासाठी पर्यायी जागाही उपलब्ध नसल्याने नदीसह पावसाचे पाणी डुंगी गावात शिरते. त्यामुळे गाव दरवर्षी जलमय होते. सतत दोन दिवस पडत असलेल्या पावसाने गावात पुरसदृश्य परिस्थिती उद्धवली आहे. पाणी उपसा करण्यासाठी सिडकोने 12 मोटर व सेक्शन पंप लावले आहेत. मात्र तरीही पाणी जात नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यांनी सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले. याची दखल घेत मंगळवारी जिल्हाधिकारी निधी चौधरी, तहसीलदार विजय तळेकर, सिडकोचे भूमी व भूमापन अधिकारी माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांडगे यांच्यासोबत ग्रामस्थांच्या वतीने रामशेठ ठाकूर, उपमहापौर जगदिश गायकवाड, 27 गाव कृती समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी यांची पदाधिकार्यांसह बैठक झाली.
या वेळी ग्रामस्थांच्या मागण्या जोरकसपणे मांडण्यात आल्या. या संदर्भात 23 जुलै रोजी पुन्हा बैठक होणार आहे. त्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. या वेळी 27 गाव कृती समिती प्रेम पाटील, कायदेशीर सल्लागार राहुल मोकल, रुपेश धुमाळ, किरण पवार, कांचन घरत, सल्लागार प्रमुख महेंद्र पाटील, सरपंच बाळाराम नाईक, कार्याध्यक्ष सुनील म्हात्रे यांच्यासह डुंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya