मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन

टीजेएसबी सहकारी बँक लि. नवीन पनवेल शाखेचा उपक्रम

पनवेल : समाजामध्ये अनेक असे महिला उद्योजिका आपला उद्योग उत्तम प्रकारे हाताळतात. आपलं संसार, घरातील सर्व माणसे कुटुंबीय हे सांभाळून सुद्धा उद्योगांमध्ये सुद्धा प्राविण्य मिळवतात. त्यासाठी लागणारे भांडवल हे आता बँकेमार्फत सहजतेने उपलब्ध होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून टीजेएसबी सहकारी बँक, नवीन पनवेल शाखेच्या वतीने महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पनवेलच्या प्रथम नागरिक महापौर डॉ.कविता चौतमोल ह्या बोलत होत्या. 

पाहायला गेलं तर अमेरिकेमध्ये एक चळवळ सुरू झाली. तिथे महिलांना बारा तास काम करावं लागत होतं त्याच्याविरुद्ध त्यांनी आंदोलन पुकारलं आणि त्यामध्ये त्यांना यश येऊन त्यांच्या कामाचा जो वेळ कमी झाला त्याचा आनंद म्हणून त्यांनी जागतिक महिला दिन साजरा करू लागले. आपल्याकडे महिलादिन साजरा करण्यामागचा हेतू म्हणजे वेगळा, आपल्या येथे महिला शिकते, ती घराबाहेर पडते, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवून त्या समाजाला आणि देशाला सुद्धा पुढे नेतात; असे अनेक उदाहरणे देऊन महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या बँकेच्या महिला ग्राहकांना, सामाजिक क्षेत्रातील कार्यरत असलेल्या महिलांना मार्गदर्शन केले.

महिलांच्या कौटुंबिक अत्याचाराविरोधात तसेच बाल गुन्हेगार व त्यांच्या न्याय हक्कासाठी सतत कार्यरत असलेल्या पनवेलच्या शुभांगी झेमसे, बाल न्याय मंडळ, रायगड महाराष्ट्र शासन सदस्य यांनीही कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या महिलांना त्यांना सामाजिक व कौटुंबिक अन्यायाविरोधात आपल्याला लढा देण्यासाठी कायदेविषयक अधिकार व त्याचं वापर याविषयी मार्गदर्शन केले. पेण नगरपालिका परिषद माजी नगरसेविका राहिलेल्या व सन 2015-16 रायगड भूषण पुरस्कार सन्मानित तसेच सन 2015-16 पनवेल गौरव पुरस्कार सन्मानित अशा थोर सामाजिक क्षेत्रातील महिला व बालकल्याण असे क्षेत्र हाताळणार्‍या शुभांगी झेमसे यांनी समाजातील महिलांना कौटुंबिक अन्याय व सध्याच्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये घटस्फोट घेण्याचे वाढते प्रमाण व त्यावर कायदेविषयक मार्गदर्शन केले. 

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट