तळोजा परिसरात बेकायदेशीर वृक्षतोड
- by
- Jan 19, 2021
- 1017 views
स्थानिक नागरिकांचा विरोध ; गुन्हा दाखल करण्याची मागणी
पनवेल ः ‘एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश सरकारकडून देण्यात येत आहे. तर दुसरीकडे तळोजा एमआयडीसी परिसरात मोठ्या संख्येने वृक्षतोड केली जात असून तोंडरे गावाच्या परिसरातील एका मोकळ्या भूखंडावर असलेल्या वृक्षाची बेकायदेशीर वृक्ष तोड केली असल्याची तक्रार तोंडरे गावातील नागरिकांनी केली आहे. याबाबत स्थानिकांनी विरोध दर्शवित गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पर्यावरणाचा र्हास रोखण्यासाठी सरकारी यंत्रणांकडून वृक्षारोपणाचा संकल्प करून झाडे लावा, झाडे जगवा अशा प्रकारचा संदेश दिला जात आहे. पनवेल महापालिकेने यासाठी खास जैवविविधता नियंत्रण समिती स्थापन केली आहे. त्यातून ते पशूपक्षी त्याचबरोबर वनस्पतींचे संवर्धन केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे; पण महानगरपालिकेच्या हद्दीतील तळोजा एमआयडीसीच्या बाजूला तोंडरे गावालगत असलेल्या परफॉर्मन्स केमिसर्व्ह प्रा.लि. कंपनीतर्फे घेण्यात आलेल्या 40 एकर शेत जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. महापालिका प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञ आहे. त्यामध्ये आंबा, कडुलिंब, ऐन, नारळ यांसारख्या अनेक झाडांचा समावेश आहे. तळोजा एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. हवेत विषारी वायू सोडले जात आहेत. या भागात वृक्षावळ असणे गरजेचे आहे; परंतु तोंडरे गावात मोठी वृक्षतोड सुरू आहे. या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने झाडे होती. त्याची सर्हास तोड करण्याचे काम सध्या सुरू आहे. याबाबत ग्रामस्थांना हि माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचले असता त्या ठिकाणी झाडे तोडण्याचे काम सुरु होते. ग्रामस्थांकडून सदर मशीन चालकाला झाडे तोडू नका असे सांगण्यात आले, तसेच कोणाच्या सांगण्यावरून झाडे तोड चालू आहेत याची विचारणा केली असता मशीनचा ड्रायव्हर त्या ठिकाणाहून काही माहिती न देता मशीन जागेवर ठेवून निघून गेला. मात्र महापालिकेने परवानगी दिली असली तरी इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षांची तोड कशी होऊ शकते? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. तोंडरे येथे जी वृक्षांची कत्तल झाली याविषयी चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवक, नगरसेविका व ग्रामस्थांनी केली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya