मुझारबानीच्या भेदक माऱ्याने आणि बेनेटच्या संयमी खेळीवर झिम्बाब्वेचा ओमानवर ८ गडी राखून दणदणीत विजय
मुझारबानीच्या भेदक माऱ्याने आणि बेनेटच्या संयमी खेळीवर झिम्बाब्वेचा ओमानवर ८ गडी राखून दणदणीत विजय
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील आठव्या सामन्यात गट ‘ब’ मध्ये झिम्बाब्वेने ओमानवर ८ गडी राखून प्रभावी विजय मिळवला. कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मैदानावर झालेल्या या सामन्यात झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला, तर फलंदाजांनी संयमी खेळी करत सहज विजय साकारला.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय झिम्बाब्वेच्या कर्णधाराने घेतला. हा निर्णय पूर्णतः यशस्वी ठरला. ब्लेसिंग मुझारबानी, रिचर्ड नगरावा आणि ब्रॅड इव्हान्स यांच्या अचूक माऱ्यापुढे ओमानचा फलंदाजी क्रम कोलमडला. ओमानचा संघ १९.५ षटकांत सर्वबाद १०३ धावांवर आटोपला.
ओमानकडून विनायक शुक्लाने २१ चेंडूंमध्ये २८ धावा करत झुंज दिली. नादीम खानने १८ चेंडूंमध्ये २० धावांची खेळी केली. सुफ्यान मेहमूदने ३९ चेंडूंमध्ये २५ धावा जोडल्या. अन्य फलंदाज अपयशी ठरले.
झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुझारबानीने ४ षटकांत अवघ्या १६ धावा देत ३ बळी घेतले. रिचर्ड नगरावाने ४ षटकांत १७ धावा देत ३ गडी बाद केले. ब्रॅड इव्हान्सने ३.५ षटकांत १८ धावा देत ३ बळी मिळवले. सिकंदर रझाने १ बळी घेतला.
१०४ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने संयमी आणि नियोजनबद्ध खेळी केली. ब्रायन बेनेटने ३६ चेंडूंमध्ये नाबाद ४८ धावा करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. तदिवानाशे मरुमानीने ११ चेंडूंमध्ये २१ धावा जोडल्या. ब्रेंडन टेलरने ३० चेंडूंमध्ये ३१ धावा करत संघाची धावसंख्या मजबूत केली. अखेरीस कर्णधार सिकंदर रझाने २ चेंडूंमध्ये नाबाद ५ धावा करत सामना संपवला.
झिम्बाब्वेने १३.३ षटकांत २ बाद १०६ धावा करत सामना सहज जिंकला. या विजयामुळे झिम्बाब्वेने गट फेरीत महत्त्वाचे दोन गुण मिळवत गुणतालिकेत भक्कम स्थान मिळवले.
या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ब्लेसिंग मुझारबानीला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. झिम्बाब्वेच्या या सर्वांगीण कामगिरीमुळे प्रेक्षकांनी सामना मनसोक्त अनुभवला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade