जनहित लोकशाही पार्टीची आमदार अमोलजी खताळ यांना सदिच्छा भेट
जनहित लोकशाही पार्टीची आमदार अमोलजी खताळ यांना सदिच्छा भेट; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सविस्तर चर्चा
संगमनेर विधानसभेचे शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे सन्माननीय आमदार मा. अमोलजी खताळ साहेब यांची जनहित लोकशाही पार्टीचे पक्षप्रमुख मा. अशोकराव आल्हाट यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार खताळ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या भेटीदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, तसेच संगमनेर व अहिल्यानगर जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली. आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय भूमिका ठरविण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील, असे संकेत दोन्ही मान्यवर नेत्यांनी दिले.
या प्रसंगी जनहित लोकशाही पार्टीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्व उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून पक्ष ताकदीने काम करणार असल्याचे मत मा. मनजाबापू साळवे यांनी व्यक्त केले.
या सदिच्छा भेटीमुळे आगामी राजकीय समीकरणांबाबत चर्चांना वेग आला असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारणात नवे संकेत मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant