शिवडीत ‘ईच्छापूर्ती श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग २०२६’चा दिमाखात समारोप;
शिवडीत ‘ईच्छापूर्ती श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग २०२६’चा दिमाखात समारोप; निःशुल्क क्रिकेट महायुद्धात खेळाडूंचा जोश, प्रेक्षकांचा उत्साह
शिवडी : वीर अभिमन्यु दीपोत्सव मंडळ, शिवडी यांच्या वतीने आयोजित ईच्छापूर्ती श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग २०२६ ही भव्य निःशुल्क क्रिकेट स्पर्धा अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात यशस्वीरीत्या संपन्न झाली. क्रिकेटचा थरार, खेळाडूंचा जोश आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे संपूर्ण शिवडी परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांना व रणधुरंधर खेळाडूंना मंडळाकडून मनापासून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
“नो लगान, बस खेलो, शान से!” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली शिवडी विभागात पार पडलेल्या या स्पर्धेतील सामने शनिवार, दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ०९.०० वाजता सुरू झाले, तर अंतिम सामना रविवार, दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी खेळविण्यात आला. ही भव्य क्रिकेट स्पर्धा बालविकास मनोरंजन मैदान, रामटेकडी, शिवडी येथे मोठ्या उत्साहात पार पडली. क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना दिलेले प्रोत्साहन हे या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले.
स्पर्धेदरम्यान अनेक सामन्यांत चुरशीची लढत पाहायला मिळाली. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनी प्रेक्षकांची मने जिंकली. निर्णायक क्षणी सामन्याचे पारडे फिरवणाऱ्या खेळीमुळे स्पर्धेची रंगत अधिकच वाढली, तर सातत्यपूर्ण व अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनी विशेष दखल घेण्यास भाग पाडले.
दरम्यान, वीर अभिमन्यु दीपोत्सव मंडळ, शिवडी यांच्या वतीने आयोजित ईच्छापूर्ती श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग पर्व १ – २०२६ मध्ये शिवडी विभागातील १६ संघांनी सहभाग घेतला होता. या पर्वात गणेशबागचा राजा या संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले, तर मुंबईची श्री महालक्ष्मी या संघाने उपविजेतेपद मिळवले.
तसेच वीर अभिमन्यु दीपोत्सव मंडळ, शिवडी आयोजित ईच्छापूर्ती श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग पर्व ८ – २०२६ मध्ये ईच्छापूर्ती युवा मंच या संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले, तर ईच्छापूर्ती दोस्ती स्ट्रीकर्स हा संघ उपविजेता ठरला.
या भव्य निःशुल्क क्रिकेट महासंग्रामामुळे क्रिकेट खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, शिवडीतील क्रीडासंस्कृतीला नवी दिशा आणि नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर