Farmer ID धारकांना मिळणार ही सुविधा मोफत
Farmer ID धारकांना मिळणार ही सुविधा मोफत
नवी दिल्ली, केंद्रीय कृषी मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आता देशभरातील शेतकऱ्यांना त्यांच्या फार्मर आयडी (Farmer ID) च्या आधारे त्यांच्या क्षेत्रासाठी सुस्पष्ट हवामान माहिती थेट मोबाईलवर मिळणार आहे. भविष्यात या फार्मर आयडीचा वापर योजना लाभ, अनुदान, विमा, बाजारभाव, प्रशिक्षण इ. साठीही होणार आहे. याशिवाय, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्रसंगी तांत्रिक मार्गदर्शन, पिकांच्या सल्ला, खतांची शिफारस इत्यादी माहितीही दिली जाऊ शकते.
सध्या भारतात 6.5 कोटीहून अधिक शेतकऱ्यांचे ‘फार्मर आयडी’ तयार करण्यात आले आहेत. या आयडीमध्ये शेतकऱ्यांच्या नावासोबत, जमिनीच्या नोंदी, शेतीचे क्षेत्र, पिकांची माहिती आणि आधार क्रमांकाचा समावेश असतो. यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचे शिवार नेमके कुठे आहे हे सरकारकडे स्पष्ट स्वरूपात नोंदले गेले आहे. याच आधारावर, हवामान खात्याच्या माहितीचा उपयोग करून शेतकऱ्यांच्या घटक पातळीवरील स्थानानुसार हवामानाचा अंदाज मोबाईलवर SMS किंवा अॅपद्वारे पाठवण्यात येणार आहे.
फार्मर आयडीच्या लोकेशननुसार हवामानाची माहिती दिली जाईल. जसे की, उदा.पुढील आठवड्यात पाऊस किती पडेल? तापमान किती असेल? वारे, आर्द्रता कशी असेल? याचा अंदाज मिळेल. ही माहिती रिअल टाइम अपडेट्ससह शेतकऱ्यांच्या भाषेत पाठवण्यात येईल. यामुळे खते पेरणी, फवारणी, कापणी, सिंचन इ. कामांबाबत शेतकऱ्याला योग्य वेळ निवडता येईल.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya