Breaking News
शाहिरी लोककलेला उज्वल भवितव्य!
मुंबई -कला कोणतीही असो,नृत्य,अभिनय किंवा गायकी, तिच्याशी कामगार कल्याण मंडळाचे नेहमीच अतुट नाते राहिले आहे. लोकमानसातून निर्माण झालेल्या शाहिरी लोककलेचे सातत्य असेच टिकून राहिले तर तिला निश्चितच उज्वल भवितव्य आहे,असा विश्वास महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी येथे लोककलेचे प्रणेते स्व.मधुशेठ नेराळे यांच्या जन्मदिनी बोलताना व्यक्त केला.त्यांच्याच हस्ते भव्य शाहिरी मेळाव्याचे उद्घाटनही पार पडले.
लोककलेच्या अस्तित्वासाठी शेवटच्या श्वासापर्यंत धडपडणारे स्व.मधुशेठ नेराळे यांचा जन्मदिन,काल लालबागच्या न्यू हनुमान थिएटर, मंगल कार्यालयात संपन्न झाला.शाहिरी लोक कला मंच आणि नेराळे परिवाराच्या संयुक्त विद्यमाने यांचे आयोजन करण्यात आले होते.या औचित्याने भव्य शाहिरी मेळावा पार पडला.मेळाव्याला मुंबईबाहेरील कलावंतानी मोठीच उपस्थिती लावली होती.लोककलेचे तपस्वी स्व.मधु नेराळे यांच्या प्रतिमेला प्रथम कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगी भव्य शाहिरी मेळाव्याचे उद्घाटन करताना कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी कलेवर नितांत प्रेम करणा-या शाहिरी लोक कलावंताचे अभिनंदन केले.या प्रसंगी ज्येष्ठ गझलकार भीमराव पांचाळे, नगरसेवक सुनिल गणाचार्य,कामगार कल्याण मंडळाच्या मुंबई विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त डॉ.घन:श्याम कुळमेथे, रामिम संघाचे उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर,वरळीतील सार्वजनिक उत्सवाचे आयोजक,कामगार नेते राजन (भाई) लाड, शाहीर रुपचंद चव्हाण,माटुंगा लेबर कॅम्पच्या नगरसेविका हर्षला आशिष मोरे आदी विविध कला,राजकीय क्षेत्रातील नामवंत मंडळी आवर्जून उपस्थित होते.प्रास्ताविक लोकप्रिय शाहीर आणि संस्थेचे सरचिटणीस मधू खामकर यांनी केले तर अध्यक्ष शाहीर शांताराम चव्हाण यांनी आभार मानले.
सर्व शाहीर शांताराम चव्हाण, दत्ता ठूले,मधु खामकर,आनंद सावंत तसेच गायक अविरत साळवी, धीरज पारकर,गीता गोलांबरे यांनी आपल्या सुरेल आवाजात गाणी सादर केली.संगि तकार मनोहर गोलांबरे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मनोवेधक सांगितला वादक अशोक वायंग णकर,ज्ञानेश ढोरे, डॉ.खुशाले यांची चांगलीच साथ लाभ ली.गणेश कारंडे यांच्या नृत्यदिग्दर्श नाखाली नरेंद्र बेलोसे, प्रकाश पांचाळ, अश्विनी कारंडे बामणोकर, तेजस्विनी कारंडे, सलोनी मांजरेकर, दीपिका मसुरकर, काव्या माने तसेच अनिल सुतार (प्रति दादा कोंडके)’माधुरी पारकर, तेजस्विनी वाडेकर आदी सर्वांनी मनोवैदक नृत्य सादर केलं. निवेदिका सरिता खांनविलकर यांनी समायोजित निवेदन केलं. सुरेखा काटकर, माणिक मयेकर, स्वरिता पाटकर,शर्वरी पवार आदींचे सहकार्य महत्त्वाचे ठरले.
कोषाध्यक्ष महादेव खैरमोडे,नेराळे कुटुंबियांचे विशेष सहकार्य लाभले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर