Breaking News
राजकुमार रावचा ‘भूल चूक माफ’ OTT वर दाखल
मुंबई - दिनेश विजन निर्मित नुकताच प्रदर्शित झालेला ‘भूल चूक माफ’ हा चित्रपट आता OTT प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर महिनाभरातच ओटीटीवर आलेला हा या वर्षातील पहिला असा चित्रपट आहे. 23 मे रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आता त्याच्या 14 दिवसांनंतर म्हणजेच प्रदर्शनाच्या दुसऱ्याच आठवड्यात हा चित्रपट ओटीटीवर आला आहे.
राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होत आहे. राजकुमार आणि वामिका यांनी सोशल मीडियावर याबद्दलचा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘पहायला विसरू नका’ असं कॅप्शन देत त्यांनी ओटीटी रिलीजची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने अवघ्या दोन आठवड्यांतच बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता. ‘भूल चूक माफ’ या चित्रपटाने 14 दिवसांत 66.75 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर चौदाव्या दिवशी कमाईचा आकडा 1.65 कोटी रुपये इतका होता. याआधी वीकेंड नसतानाही या चित्रपटाने चांगली कमाई केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर