Breaking News
पनवेल : संपूर्ण राज्यभरात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने कोवीड आपत्ती निवारण वैद्यकीय मदत वाटप सुरू असताना रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रत्येक तालुक्यामध्ये व शहरांमध्ये कोविड आपत्ती निवारण वैद्यकीय मदतीचे वाटप जोमाने सुरू असताना पनवेल तालुका प्राथमिक शिक्षक परिषदेच्या वतीने शुक्रवारी उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे विविध मान्यवरांच्या हस्ते कोविड आपत्ती निवारण वैद्यकीय मदत साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक गणेश कडू, पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोहकर, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बसवराज लोहारे उपस्थित होते. सुरुवातीस शिक्षक परिषदेचे जिल्हा कोषाध्यक्ष सुशील वाघमारे यांनी प्रस्तावनेतून कोविड काळात संपूर्ण राज्यभरात प्राथमिक शिक्षक परिषदेच्या वतीने चालू असलेल्या मदतीचे स्वरूप विषद केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya