Breaking News
मुंबई : मुंबईकरांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा कार्यक्रम पाहण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते इल्यूजनिस्ट आणि माईंड रीडर समीर ज्ञानेश्वर आपला विलक्षण प्रयोग “मनकवडा” घेऊन येत आहेत.
मुंबईपासून लास वेगासपर्यंत तब्बल ८१ हून अधिक देशांतील प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या समीर यांचा हा प्रयोग वाशी, चेंबूर आणि ठाणे येथे हाऊसफुल ठरला आहे. आता शनिवार, दि. २० सप्टेंबर रोजी रात्री ८ वा. रवींद्र नाट्य मंदिराच्या लघुनाट्यगृहात प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे.
अश्विनी थिएटर्स निर्मित या कार्यक्रमाची संकल्पना व लेखन समीर ज्ञानेश्वर यांचे असून, निर्माता ज्ञानेश्वर डोंगरे आहेत. प्रेक्षकांच्या मनातील गुपिते अचूक ओळखणारा हा प्रयोग त्यांना तब्बल ३ तास खेळवून ठेवतो व थक्क करून सोडतो. भाषेचा “मुंबई कॉकटेल” (मराठी + हिंदी + इंग्रजी) स्वरूपातील हा माईंड रीडिंग शो विशेष आकर्षण ठरणार आहे.
या प्रयोगात सहाय्यक दिग्दर्शक श्लोक राणे, संगीत संयोजक षणमुखानंद आवटे, गायक व संगीतकार सुमंत देशपांडे, प्रकाशयोजना स्वप्रिल साळवी, गीतकार जीतू आर. म्हात्रे तसेच नेपथ्य दशरथ सुतार व विजय तावडे यांचा सहभाग आहे.
ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी बुक माय शोवर तसेच फोन क्रमांक ८५३०८८६७२७ वर संपर्क साधता येईल.
‘मनकवडा’ जाणतोय… तुमच्या मनातलं!
एकदा पाहाल, तर विसरणं अशक्य!
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant