Breaking News
दि मुनिसिपल कॉपरेटिव बँक लिमिटेड यांच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक सन 2025 2030 यामध्ये श्री विष्णू घुमरे अध्यक्ष पॅनल प्रमुख श्रीमती वर्षा माळी प्रमुख मार्गदर्शक व श्री महावीर बनगर सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली जय सहकार पॅनलने निवडणूक प्रचारांमध्ये आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. श्री विष्णू घुमरे माजी संचालक व पॅनल प्रमुख यांच्या सन 2020 2025 त्या कालावधीमध्ये सभासदांच्या हितासाठी घेतलेले चांगले निर्णय व यावर्षी बँकेने मिळवलेला निव्वळ नफा,सभासदांसाठी सुरु झालेली विमा पोलिसी यामुळे सभासदांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण दिसत असून पुन्हा एकदा जय सहकार पॅनललाच बहुमताने निवडून आणण्याचा बहुतांश सभासदांनी निर्णय घेतल्याचे चित्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अनेक पाणी खाते, घनकचरा व्यवस्थापन खाते व परिरक्षण खात्याच्या चौकीमधून दिसून येत आहे. तसेच श्री विष्णू घुमरे यांच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षतेखालील दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेने विविध संस्थेकडून बँकिंग फ्रंटिअर, बँकॊ, महाराष्ट्र अर्बन को ऑप बॅंक्स फेडरेशन, दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक असोसिएशन असे सातत्याने मिळणारी बक्षीस यामुळे वैद्यकीय व शिक्षण या खात्यातील सभासदांनी देखील या विद्यमान संचालक मंडळांनाच पुन्हा निवडून देण्याचे आशादायी चित्र दिसून येत आहे.तसेच या प्रचाराच्या रनधुमाळीत पॅनल च्या इतर मागासवर्गीय (ओबीसी )मतदार गटातून श्री. साईनाथ घरत यांनी घेतलेली अथक मेहनत, प्रत्येक सभासदांशी घेतलेल्या प्रत्यक्ष भेटीमुळे ते जायन्ट किलर होणार असे चित्र दिसून येत आहे.जय सहकार पॅनल मधील 19 जण प्रत्येक खात्यातील अधिकारी कर्मचारी यांना विश्वासात घेऊन बनवलेले पॅनल आहे व सगळे मिळून पॅनलला विजयी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. श्री विष्णू घुमरे यांनी समस्त सभासदांना पुन्हा एकदा दीड नारळ या शुभ चिन्हावर शिक्का मारून जय सहकार पॅनलला मागील वेळेपेक्षा भरघोस मतदान करून पुन्हा एकदा बँकेची कमान सांभाळायचा बहुमान द्यावा ही नम्र विनंती केलेली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant