Breaking News
कॅडबरी डेअरी मिल्कच्या रॅपरवर खास मराठीत शब्द
मुंबई - कॅडबरी डेअरी मिल्कने मराठी शब्द रुजवण्यासाठी खास उपक्रम सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रसिद्ध चॉकलेट कंपनीने आपल्या पॅकेजिंगमध्ये एक खास बदल केला आहे, ज्यामुळे आता मराठी भाषा थेट चॉकलेटच्या रॅपरवर दिसत आहे. ‘जरा जरा मराठी…’ या घोषणेसह कॅडबरीने इंग्रजी आणि मराठीतील काही सोपी वाक्ये छापली आहेत. यामुळे सोशल मीडियावरया उपक्रमाचे जोरदार कौतुक होत आहे, आणि अनेकांनी याला महाराष्ट्रातील मराठीच्या भूमिकेशी जोडले आहे.
रॅपरवर काय लिहिले आहे?
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये कॅडबरीच्या रॅपरवर इंग्रजी आणि मराठीतील काही संवाद छापले आहेत, जसे की: ‘जरा जरा मराठी…’, ‘थँक यू – धन्यवाद’, ‘व्हॉट?-काय’, ‘हाऊ आर यू?-कसे आहात?’, ‘सॉरी – माफ करा’, ‘नीड हेल्प – मदत हवी का?’, लिटल – जरा’, ‘इव्हिनिंग – संध्याकाळ’, असे शब्द रॅपरवर छापले आहेत.
डेअरी मिल्कच्या या रॅपरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी यासाठी कंपनीचे कौतुक करत आहेत. बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळानेही (Brihanmaharashtra Marathi Mandal) कॅडबरी डेअरी मिल्कच्या या उपक्रमाचे आभार मानले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर