Breaking News
स्विगीच्या डिलिव्हरी शुल्कात वाढ
मुंबई - स्विगीवरुन जेवण मागवणे महाग होणार आहे. कंपनीने नुकतीच आपली शुल्कात वाढ केली होती. त्यामुळे पुन्हा सणाच्या तोंडावर शुल्क वाढल्याने ऑनलाईन पदार्थांची ऑर्डर करणे महागात पडणार आहे. आता दर फूड डिलीव्हरी ऑर्डरवर कंपनी १४ रुपये आकारणार आहे. आधी कंपनी १२ रुपये आकारात होती,म्हणजे २ रुपयांनी शुल्क वाढले आहे. कंपनीच्या मते प्रत्येक ऑर्डरवर नफा वाढेल आणि एकूण वित्तीय स्थिती आणखी मजबूत होईल, विशेष म्हणजे स्विगी कंपनीने अलिकडेच दरवाढ केली होती. स्विगी दररोज २० लाखाहून अधिक ऑर्डर डिलिव्हरी करते. अशा प्रत्येक ऑर्डरमागे जर दोन रुपये अतिरिक्त मिळाले तर कंपनीला रोज सुमारे २.८ कोटी रुपये अतिरिक्त मिळतील. तिमाहीत ही रक्कम ८.४ कोटी रुपये होईल.
स्विगीने एप्रिल २०२३ मध्ये प्रथम प्लॅटफॉर्म फि स्विकारणे सुरु केले होते. युनिट इकॉनॉमिक्स म्हणजे प्रति ऑर्डर नफा वाढवण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले होते. गेल्या दीड वर्षात कंपनीने अनेकदा फि वाढवली आहे. विशेष म्हणजे किंमत वाढूनही ऑर्डरच्या संख्येवर कोणताही विपरीत परीणाम झालेला नाही. सण आणि हायडीमांड असल्याने आधीही स्विगी आणि त्याचा स्पर्धक झोमॅटो यांनी फी वाढवली होती. जर ऑर्डरच्या संख्ये घसरण झाली नाही, तर हा बदल बराच काळ लागू रहातो.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade