Breaking News
बेस्ट सोसायटी निवडणूकित बेस्ट परिवर्तन पॅनल उतरणार
कामगारनेते विठ्ठलराव गायकवाड
मुंबई – मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन, बेस्ट कामगार क्रांती संघ आणि बेस्ट कामगार संघटनेच्या संयुक्त विद्यमाने, तसेच श्री. विठ्ठलराव गायकवाड (सरचिटणीस) आणि श्री. अशोक चव्हाण (अध्यक्ष) यांच्या उपस्थितीत आज (१२ ऑगस्ट २०२५) पत्रकार परिषदेत विद्यमान संचालक मंडळावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. बेस्ट सोसायटी निवडणूकित परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार निवडणूक लढवणार आणि जिंकणार .
मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी सांगितले की, ९ वर्षांनी होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोसायटीच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाली आहे. लोणावळ्यात सहा बंगले, दादर व बोरिवलीसह विविध विभागात कार्यालये रेडी रेकनरपेक्षा तीनपट दराने खरेदी करण्यात आली. या व्यवहारांत ब्लॅक मनीचा वापर झाला असल्याचा आरोप त्यांनी केला.
नूतनीकरणाची कामे नातेवाईक व सहकाऱ्यांना देऊन कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावाही करण्यात आला. वडाळा येथील बेस्ट कामगार सेनेचे कार्यालय खरेदी करताना बँक कर्जाचा बनाव केल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला.
गेल्या चार वर्षांत मोठ्या संख्येने सभासदांनी सोसायटीतून बाहेर पडल्यामुळे सध्या फक्त १५,०९३ सभासद उरले आहेत.
या पार्श्वभूमीवर “बेस्ट परिवर्तन पॅनल”ने १९ मुद्द्यांचा वचननामा जाहीर केला आहे. त्यात दीर्घमुदत व शैक्षणिक कर्जाची रक्कम वाढवून व्याजदर कमी करणे, २० लाखांपर्यंत विमा संरक्षण, आरोग्यविमा, अपघात विमा, पारदर्शक कामकाज, भ्रष्टाचार चौकशी व दोषींवर कारवाई करण्याचा संकल्प देखील केला आहे.सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुका सोमवार, १८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडतील तरी जास्तीत जास्त सभासदानी निवडणुकीचा हक्क बजावावा असे आवाहन विठ्ठल गायकवाड यांनी केले आहे
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade