Breaking News
श्री संतसेना महाराज पुण्यतिथी उत्सव व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळाचे आयोजन
मुंबई - श्री संतसेना स्मारक मंडळ, मुंबई यांच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दि. 20 ऑगस्ट 2025, बुधवार रोजी आयोजित करण्यात आला आहे. दादर (पश्चिम) येथील श्री संतसेना महाराज सभागृह, इराणी मंझील, सेनापती बापट मार्ग येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. मंडळाच्या परंपरेप्रमाणे यंदाही समाजबांधव व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक
खालीलप्रमाणे आहे:
प्रमुख पाहुणे:
श्री. प्रशांत सकपाळ (उद्योजक), श्री. मुकुंद महाले (लेखक), श्री. गोविंदराव मोहिते (राष्ट्रीय मिल मजदूर संघ), श्री. दत्ता अनारसे (महाराष्ट्र नाभिक महामंडळ, ठाणे), श्री. मनीष चव्हाण (मा. नगरसेवक), सौ. नम्रता भोसले-जाधव (मा. नगरसेविका), श्री. सुनील पवार (उद्योजक), श्री. जीवन यादव (संपादक - बालविकास मंदिर) आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
विशेष सूचना:
हटीप - कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व समाजबांधव आणि विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाची सुंदर व्यवस्था करण्यात आली आहे.
विशेष सहकार्य: अनंत कदम, मोतीराम जाधव, प्रदीप पवार, अरविंद क्षीरसागर, दत्तात्रय चव्हाण, कमलाकर मोहिते, अशोक कदम, सुरेश जाधव, विलास चव्हाण (A.घ् ), अशोकराव झिंजे, चित्रा पवार, शांताराम कदम, सहकार्य सचिन शिंदे, तुषार चव्हाण, रमेश पवार, सुनीता चव्हाण, सत्यवान भोसले, प्रमोद कदम, प्रमोद पाटील
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade