Breaking News
आजच्या पतसंस्था आपल्याच गोठ्यातील गोमाता!
मुंबई - आज देशी-परदेशी बँकांच्या स्पर्धेत सहकारी पतसंस्था आपल्याच गोठ्यातील गोमाता आहेत.कधीही आणि केव्हाही दूध घ्या किंवा दूधजन्य पदार्थ खा,त्याला अवाच्या सव्वा 'टॅक्स' नाही की 'जीएसटी' नाही,असे विचार गोकुळधाम पतसंस्थेचे अध्यक्ष काशिनाथ माटल यांनी येथे वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना मांडले.
काशिनाथ माटल म्हणाले,आज विविध बॅंकाद्वारे शिक्षण,व्यवसाय, निवास यासाठी त्वरेने कर्ज उपलब्ध करून दिले जाते.पण मासिक 'इएमआय'ची तारीख जर मागेपुढे झाली तर,कर्जदारांचा ससेमिरा सुरू होतो.पण असल्या कोणत्याही बॅंकीग सुविधा विभागात उपलब्ध नव्हत्या, त्याकाळी गोकुळधाम पतसंस्थेने कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले आहे.कर्जहप्ता चुकला की, कसलाही ससेमिरा नसतो. कर्जबुडवेगिरी विरोधात सहकारी न्यायालत धावा घेवून कलम 101 खाली गुन्हा शाबीत करता येतो.पण तसल्या गुह्यात सरकार पतसंस्थांच्या पाठिशी ठाम उभे राहात नाही.त्यामूळे कर्ज बुडवेगीरी (ऱझ्A) वाढत गेली आहे.त्यातूनच आज जवळपास 25 ते 45 टक्के पतसंस्थाना कायमचे टाळे लावण्याचा धोका निर्माण झाला आहे. परंतु काहीही झाले तरी जेव्हा आपण संकटात येतो तेव्हा आपण सदस्य असलेली पतसंस्थाच आपल्या पाठी ठामपणे उभी राहाते म्हणूनच ती आज आपल्या गोठ्यातील गोमाता आहे.मात्र ती कायम दूध देत रहावी,याची जबाबदारी सदस्यांवर असते.
सेक्रेटरी श्रीपाद दिवेकर म्हणाले,आज कोटी-दोन कोटी रुपये कर्जा साठी धाव अधिक असते.मात्र लहान-मध्यम वर्गातील पतसंस्थांकडे ती ऐपत नसते. पतसंस्था नेहमीच परस्पर विश्वासावर चालत असतात. भांडवल उभारणी आणि चोख कर्जवसुलीतून पतसंस्था सबळ पायावर उभ्या रहाताल.संचालक गोविंद आजगावकर म्हणाले, आजकाल पतसंस्थाकडून कर्ज घेण्याचा ओढा घटला आहे,असे असले तरी गरजवंत महिलांकडून गरजेचे कर्ज घेतले जाते आणि ते प्रामाणिकपणे फेडलेही जाते,या गोष्टीचे स्वागत करुन,कर्ज प्रक्रियेला चालना मिळावी यासाठी सभासदांच्या कर्जव्याजात 2 टक्के सवलत देण्याचा सभेत एकमुखी निर्णय घेण्यात आला.पतसंस्थेचा वार्षिक ताळेबंदाला सभेने मंजुरी दिली.
गोकुळधाम फेडरेशनचे अध्यक्ष प्रतापराव महाडीक उपस्थित सदस्यांच्या वतीने म्हणाले,गोकुळधाम पतसंस्थेने जिद्द, प्रामाणिकपणा आणि कष्ठ या जोरावर संस्थेचे नाव लौकीक केले,ही गोष्ट गोकुळधाम वासियांना अभिमानास्पद आहे!
उपाध्यक्ष अनंत शिंदे, संचालक लक्ष्मण भेलसेकर,नागेश भांडे, आदिती परब या बरोबरच व्यवस्थापक जया चव्हाण यांनी सभेत भाग घेतला.लक्ष्मण भांडे,एस.टी.सावंत,विजय सावंत, निळकंठ भाबळ आदीं सदस्यांनी ठरावांना पाठिंबा दिला.(उबाठा) शिवसेनेचे महाप्रतोद आमदार सुनील प्रभू, उपनेते अमोल कीर्तिकर महत्वाच्या कामात व्यस्त राहिल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.संस्थेचे दिवंगत माजी अध्यक्ष श्रीधर तानावडे तसेच अन्य दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे