Breaking News
या दिवशी सुरु होणार नागपूर-पुणे वंदे भारत
पुणे - देशातील तीन मार्गांवर नव्यानं वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन याबाबत माहिती दिली. नागपूरमधील अजनी रेल्वे स्थानकातून वंदे भारत एक्स्प्रेस 10 ऑगस्टला पुण्यातील हडरपसर रेल्वे स्थानकाकडे रवाना होईल. या दोन्ही स्थानकांमधील अंतर 850 किमी अंतर आहे. वंदे भारत एक्स्प्रेस 12 तासात हे अंतर पार करेल.
या बरोबरच बंगळुरु- बेळगाव, अमृतसर ते श्री वैष्णोदेवी कटरा या मार्गांवरही वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहेत.
सध्या महाराष्ट्र एक्सप्रेसला पुणे ते नागपूर अंतर पूर्ण करण्यासाठी 18 तासांहून अधिक तास लागतात. तर इतर मेल एक्सप्रेस 16 तासांपर्यंत वेळ घेतात. हावडा दुरांतो मात्र 13 तासात पुणे-नागपूर अंतर पार करते.
सध्या पुणे रेल्वे स्थानकावरुन नव्या एक्स्प्रेस सुरु होणं शक्य नाही. त्यामुळं ही वंदे भारत एक्स्प्रेस पुणे जंक्शन ऐवजी हडपसर रेल्वे स्थानकापर्यंत धावेल. अजनी-हडपसर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, दौंड या स्थानकांवर थांबे असण्याची शक्यता आहे. वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन हायस्पीड, आरामदायी असल्यानं प्रवासाचा वेळ देखील कमी होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे