Breaking News
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतील पहिल्या Tesla शोरूमचे उद्घाटन
मुंबई - जगप्रसिद्ध उद्योगजक इलॉन मस्क यांच्या इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपनी टेस्लाने कंपनीने शोरुम आता मुंबईत देशातील पहिले शोरूम सुरु केले आहे. आज मुंबईतील बीकेसीमध्ये या शोरूमचे उद्घाटन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. टेस्लाने आपल्या शोरूमच्या पाट्या मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये लावून मराठी भाषेला विशेष मान दिला आहे. स्थानिक संस्कृती आणि भाषेचा आदर केल्याबद्दल फडणवीस यांनी कौतुक केले.
टेस्लासारख्या जागतिक कंपनीचे महाराष्ट्रात आगमन होणे हे राज्याच्या औद्योगिक प्रगतीला चालना देणारे आहे. टेस्लाने मराठी भाषेचा आदर राखत स्थानिक नियमांचे पालन केले आहे. यामुळे राज्यातील स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. राज्य सरकार निवेशकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यास कटिबद्ध आहे आणि टेस्लाचे हे शोरूम राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देईल. जगातील सर्वात स्मार्ट कार मुंबईतून आता भारतात येत आहे ही महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्र सरकारने इव्ही गाड्यांसाठी अनेक सुविधा दिल्या आहेत. चार्जिंग स्टेशन, गाडीवरचे कर आणि विविध सुविधा दिलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे देशातील इलेक्ट्रिक वाहन करिता सर्वात आवडते ठिकाण झाले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी उदघाटन कार्यक्रमात म्हटले.
यावेळी टेस्लाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे शोरूम ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांचा अनुभव देण्यासाठी ‘टेस्ला एक्सपिरियन्स सेंटर’ म्हणून कार्यरत असेल. येथे ग्राहकांना टेस्लाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळेल आणि वाहनांची चाचणीही घेता येईल. सध्या भारतात फक्त मॉडेल वाय कार विकली जाईल. तिची किंमत ६० लाख रुपयांपासून सुरू होते. ही अमेरिकेपेक्षा २८ लाख रुपये जास्त आहे.टेस्लाच्या वेबसाइटनुसार, तुम्ही आजपासून म्हणजेच १५ जुलैपासून मॉडेल वाय ऑर्डर करू शकता. ते दोन प्रकारांमध्ये लाँच केले गेले आहे. त्याची सुरुवातीची किंमत ६० लाख रुपये आहे आणि त्याची रेंज ५०० किमी असेल. दुसऱ्या प्रकाराची किंमत ६७.८९ लाख रुपये आहे. त्याची रेंज ६२२ किमी असेल. त्याची डिलिव्हरी ऑक्टोबरपासून सुरू होईल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade