Breaking News
राज्यात आठ ठिकाणी सुरू होणार ‘सी-प्लेन’ सेवा, फक्त एवढे असतील तिकीट दर
Maharashtra Sea Plane Service: महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच आठ ठिकाणी ‘सी-प्लेन’ सेवा सुरू होणार आहे. देशात पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि दुर्गम भागांना हवाई मार्गाने जोडण्यासाठी केंद्र सरकारने 'उडान 5.5' योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत हेलिकॉप्टर आणि 'सी-प्लेन' (जलाशयात उतरणारे विमान) सेवा सुरू करण्याची महत्त्वाकांक्षी योजना सरकारने आखली आहे. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आठ ठिकाणी 'एअरो ड्रोम' (जलाशयातील तात्पुरती धावपट्टी) उभारण्याचा प्रस्ताव मांढण्यात आला आहे.
महाराष्ट्रात आठ ठिकाणी 'सी-प्लेन' सेवा
लोकसत्ताने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, 'उडान 5.5' योजनेचा भाग म्हणून देशभरातील 150 जलस्थळांवर सी प्लेन सेवा सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. यासोबतच महाराष्ट्रातील आठ ठिकाणी 'एअरो ड्रोम' (जलाशयातील तात्पुरती धावपट्टी) उभारण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (MADC) भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) आणि नागरी उड्डाण मंत्रालयाला (MCA) सादर केला आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील अनेक सुंदर ठिकाणांना हवाई मार्गाने भेट देणे शक्य होणार आहे.
प्राथमिक टप्प्यात 'या' ठिकाणांची निवड
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्राथमिक टप्प्यात महाराष्ट्रासोबत केरळ, आंध्र प्रदेश, अंदमान व निकोबार आणि लक्षद्वीप या ठिकाणांची 'सी-प्लेन' सेवा सुरू करण्यासाठी निवड केली आहे. सर्वप्रथम या ठिकाणी असलेल्या नद्या आणि मोठ्या जलाशयांवरून ही हवाई वाहतूक सेवा सुरू केली जाईल. या प्रकल्पासाठी कॅनडातील 'डे हविलंड एअरक्राफ्ट ऑफ कॅनडा लिमिटेड' या कंपनीची खास विमाने वापरली जाणार आहेत.
महाराष्ट्रात या 8 ठिकाणी सुरू होणार सी प्लेन
परवडणारे असतील तिकीट दर
इंडिगो आणि पवनहंस यांसारख्या मोठ्या कंपन्या देशात 'सी-प्लेन' सेवा सुरू करण्यास उत्सुक आहेत. सरकारने या सेवेसाठी कमी 'गॅप फंडिंग' (व्यवहार्यता अनुदान निधी) देण्याचे मान्य केले आहे. यामुळे प्रवाशांना जलवाहतुकीचे शुल्क साधारण दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत परवडणारे असेल, अशी माहिती नागरी विमान वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना
जलवाहतुकीचे शुल्क साधारण दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत असल्याने सामान्य प्रवासी आणि पर्यटकांनाही या अनोख्या सेवेचा लाभ घेता येईल. या वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजेच डिसेंबरपर्यंत या सेवेचा देशभरात विस्तार केला जाईल असेही सांगण्यात आले आहे. या 'सी-प्लेन' सेवेमुळे महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला नक्कीच मोठी चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant