Breaking News
????
महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ रोवणारे तसेच भारतीय उद्योग जगतातील एक दूरदृष्टी संपन्न नेतृत्व लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या १५६ व्या जयंती निमित्त बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मुंबई येथे संपन्न झालेल्या ग्लोबल मराठी उद्योजकीय परिषद २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री मा. उदय सामंत, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मा. मंगलप्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई उपनगर पालकमंत्री मा. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बेस्ट डिजिटल क्रिएटर अवॉर्ड २०२५ या पुरस्काराने ब्रँड्स मेकर चे सर्वेसर्वा भरत शिंदे यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्कार ही केवळ ट्रॉफी नसते, ती तुमच्या कर्तृत्वावर उमटवलेली समाजाची स्वाक्षरी असते अशी प्रतिक्रिया पुरस्कार प्राप्त ब्रँड्स मेकर चे भरत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मी उद्योजक होणारच ह्या संस्थेच्या माध्यमातून गेली 12 वर्षे मराठी उद्योजकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, 1500 हून अधिक उद्योजकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष कामगिरी संपादन केलेल्या उद्योजकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant