NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

‘वेटिंग लिस्ट’ बाबत रेल्वेचा मोठा निर्णय

‘वेटिंग लिस्ट’ बाबत रेल्वेचा मोठा निर्णय

नवी दिल्ली - रेल्वे बोर्डाने तिकीट यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी व प्रवाशांची गाडीतील गर्दी कमी करण्यासाठी नवीन निर्णय घेतला आहे. आता कोणत्याही लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये मोठी ‘वेटिंग लिस्ट’ जारी होणार नाही. प्रत्येक गाडीत ‘वेटिंग लिस्ट’च्या तिकिटांच्या संख्येला कात्री लावण्यात येणार आहे. गाडीतील एकूण प्रवासी संख्येच्या २५ टक्केच अधिक ‘वेटिंग तिकिटे’ जारी करण्यात येतील. हा नियम सर्वच वर्गांसाठी लागू होणार आहे. ‘वेटिंग’ तिकीट असलेले अनेक प्रवासी रेल्वेत चढत असल्याच्या असंख्य तक्रारी रेल्वेकडे येत होत्या. त्यामुळे ट्रेनमध्ये गर्दी वाढून पक्के तिकीट असलेल्या प्रवाशांवर अन्याय होत होता. हे विचारात घेऊन रेल्वेने आता कायमस्वरूपी हा निर्णय लागू केला आहे.

रेल्वे बोर्डाने सर्वच रेल्वे विभागांना याबाबतचा आदेश पाठवला आहे. त्यानुसार, ‘वेटिंग लिस्ट’च्या तिकिटांची संख्या प्रत्येक वर्गातील एकूण तिकिटांपेक्षा २५ टक्क्यांपेक्षा अधिक नसेल. उदा. एका गाडीत ‘स्लीपर’ वर्गाची १०० तिकिटे असल्यास ‘वेटिंग लिस्ट’मध्ये २५ जणांचीच नावे असतील.

यापूर्वी ‘वेटिंग लिस्ट’ला कोणतीही मर्यादा नव्हती. सणासुदीला व सुट्ट्यांमध्ये ‘स्लीपर’ वर्गात ३०० पेक्षा अधिक, तर ‘एसी’त १५० पेक्षा अधिक वेटिंग होत होते. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. ज्यांच्याकडे रेल्वेचे पक्के (कन्फर्म) तिकीट नव्हते. तेही ट्रेनमधून प्रवास करत होते. त्यामुळे गाडीत पाय ठेवायलाही जागा होत नव्हती.

प्रत्येक डब्यातील जागांपेक्षा २५ टक्के अधिक ‘वेटिंग लिस्ट’ असेल. सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या तिकिटांसाठी हा निर्णय लागू असेल. ज्येष्ठ नागरिक, महिला, परदेशी पर्यटक व दिव्यांग आदींसाठी आरक्षित असलेल्या तिकिटांचा ‘वेटिंग लिस्ट’मध्ये समावेश नसेल. उदा. सर्व प्रकारचा कोटा हटवल्यानंतर ४०० तिकिटे उपलब्ध असल्यास १०० पर्यंत वेटिंग लिस्ट असेल. हा नियम स्लीपर, थर्ड एसी, सेकंड एसी, चेअर कार, तत्काळ आदींसाठी लागू असेल.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट