NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

New India Bank घोटाळा प्रकरणी 12 जणांवर एफआयआर दाखल

New India Bank घोटाळा प्रकरणी 12 जणांवर एफआयआर दाखल

मुंबई - New India Cooperative Bank बॅँकेत झालेल्या २४ कोटी ९३ लाख रुपयांच्या कर्ज गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ED) बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, माजी आमदार रणजित भानू, त्यांच्या मुलगा हिरेन भानू , हिरेनची पत्नी बँकेची माजी उपाध्यक्ष गौरी हिरेन भानू यांच्यासह १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी इडीने दाखल केलेला हा दुसरा एफआयआर आहे.

इडीचा असा आरोप आहे की, २०१४ ते २०२३ या कालावधीत आरोपींनी लोअर परेल स्थित परसेप्ट स्पोर्ट्स अँड एंटरटेन्मेंट या कंपनीला आवश्यक नियमांचे पालन न करता ७७ कोटी रुपयांचे कर्ज दिले.

कंपनीने कर्जाची परतफेड करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर एकरकमी कर्जफेड योजनेच्या (वन टाईम सेटलमेंट) नावाखाली मुद्दल रकमेतून कंपनीला १८ कोटी ५६ लाख रुपयांची माफी दिली. या एकरकमी कर्जफेडीसाठी कंपनीला लंडनस्थित हर्मिस स्पोर्ट्स अँड एन्टरटेन्मेंट या कंपनीने मदत केली होती. त्याबदल्यात परसेप्ट कंपनीने हर्मिस कंपनीला ६ कोटी ३७ लाख रुपये लाच दिली.अशा प्रकारे एकूण २४ कोटी ९३ लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी इडीने हा एफआयआर दाखल केला आहे.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट