Breaking News
फक्त ३ हजार रुपयांत मिळणार वार्षिक Fastag pass
नवी दिल्ली - केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वार्षिक फास्टॅग पासशी संबंधित एक नवीन योजना सुरू केली आहे. ही योजना वार्षिक पास आहे. हा पास फक्त खाजगी वाहनांसाठी आहे. Fastag pass सेवा १५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होईल आणि त्याची किंमत ३,००० रुपये असेल. यामध्ये वर्षांला २०० ट्रिप करता येतील.
नितीन गडकरी यांनी एक्सवर म्हटले की, एका ऐतिहासिक उपक्रमात १५ ऑगस्ट २०२५ पासून ३००० रुपयांचा फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू करण्यात येत आहे. हा पास सक्रिय झाल्यापासून एक वर्षासाठी किंवा २०० ट्रिपसाठी, जे आधी असेल ते वैध असेल. हा पास विशेषतः कार, जीप, व्हॅन इत्यादी बिगर व्यावसायिक खाजगी वाहनांसाठी आहे.
नितीन गडकरी म्हणाले की, Fastag pass राजमार्ग यात्रा मोबाईल अॅपवर उपलब्ध असेल. वार्षिक पास सक्रिय करण्यासाठी/नूतनीकरण करण्यासाठी लवकरच हायवे ट्रॅव्हल अॅप आणि एनएचएआय/एमओआरटीएच वेबसाइटवर एक वेगळी लिंक उपलब्ध करून दिली जाईल. यामुळे प्रक्रिया सोपी आणि त्रासमुक्त होईल. हे धोरण ६० किमीच्या परिघात असलेल्या टोल प्लाझांबद्दलच्या दीर्घकालीन चिंता दूर करेल आणि एकाच सोयीस्कर व्यवहाराद्वारे टोल पेमेंट सुलभ करेल.
केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गासाठी तीन हजार रुपयांच्या वार्षिक पासची घोषणा केली असून आम्ही त्याचे स्वागत करतो. पुणे-मुंबई एक्सप्रेसवे वरूनही मोठ्या प्रमाणावर दैनंदिन पातळीवर लोक प्रवास करतात. या प्रवासासाठी देखील वार्षिक पासची मोठी आवश्यकता आहे. म्हणूनच माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी याच धर्तीवर पुणे- मुंबई एक्सप्रेसवे (अटल सेतू सह ) वार्षिक पासची घोषणा करून दैनंदिन प्रवाशांना दिलासा द्यावा. – जयंत पाटील
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे