Breaking News
SBI कडून सर्व FD आणि बचत खात्यांवरील व्याजदरात कपात
मुंबई - SBI ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने त्यांच्या सर्व एफडीवरील व्याजदर ०.१५ टक्के ते ०.२५ टक्के कमी केला आहे. हे व्याजदर ३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर आहे. एसबीआय बँकेचे नवीन दर १५ जूनपासून लागू झाले आहेत. आरबीआयने पुन्हा रेपो दर कमी केल्यानंतर बहुतेक बँका एफडीवरील व्याज कमी करत आहेत.
एसबीआयचे एफडीवरील नवीन व्याजदर
७ दिवस ते ४५ दिवस: सर्वसामान्यांसाठी – ३.०५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: ३.५५%
४६ दिवस ते १७९ दिवस: सर्वसामान्यांसाठी – ५.०५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: ५.५५%
१८० दिवस ते २१० दिवस: सर्वसामान्यांसाठी – ५.८० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: ६.३०%
२११ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी: सर्वसामान्यांसाठी – ६.०५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: ६.५५%
SBIने त्यांच्या विशेष एफडी अमृत वृष्टीवरील Amrut Vrushti व्याजदरही कमी केला आहे. अमृत वृष्टी एफडी योजना ही ४४४ दिवसांची एक विशेष एफडी आहे. यामध्ये सामान्य एफडीपेक्षा जास्त व्याज दिले जात होते. बँकेने यावर व्याजदरही ६.८५ टक्क्यांवरून ६.६० टक्के केला आहे. ज्येष्ठ नागरिकांना ०.५० टक्के अतिरिक्त व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना ४४४ दिवसांच्या अमृत वृष्टी एफडी योजनेवर ७.१० टक्के व्याज मिळेल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade