Breaking News
स्वयंपुनर्विकास प्रस्तावांसाठी प्रीमियमवरील व्याज माफ
मुंबई – स्वयंपुनर्विकास हाच आत्मनिर्भर विकास असून यातून आत्मनिर्भर मुंबईकर उभा करू असा संकल्प व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वयंपुनर्विकास प्रस्तावांसाठी प्रीमियमवरील तीन वर्षापर्यंतचे व्याज माफ करू, असे आश्वासन चारकोप श्वेतांबरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वयंपुनर्विकसित प्रकल्पाचे उद्घाटन व चावी वाटप कार्यक्रमात मुंबईकरांना दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली असून तसा शासन निर्णयही आज जारी करण्यात आला आहे.
शासनाने जारी केलेल्या निर्णयात म्हटले आहे कि, म्हाडा अभिन्यासातील वि. नि. व प्रो. नि. २०३४ मधील विनियम ३३ (५) अंतर्गत स्वयंपुनर्विकास प्रकल्पाकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेनुसार स्वयंपुनर्विकासाकरिता जारी करण्यात आलेल्या देकारपत्रामधील अधिमूल्य रकमेवरील व्याज माफ करण्याबाबत सादर केलेल्या प्रस्तावास शासन मान्यता देण्यात येत आहे. शासनाच्या या निर्णयामुळे येणाऱ्या काळात स्वयंपुनर्विकास मुंबईत गती घेताना दिसणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनुसार शासनाने स्वयंपुनर्विकास प्रस्तावांसाठी प्रीमियमवरील व्याज माफ केल्याने भाजपा गटनेते, मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि दरेकर समितीचे प्रमुख आमदार प्रविण दरेकर यांनी मुंबईकरांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade