Breaking News
राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी मुंबई शहर च्या प्रतिनिधी संघात
जिजामाता महिला संघाची खेळाडू कु. प्राची राऊत हिची निवड
मुंबई - महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा दिनांक 14 जून ते 18 जून 2025 या कालावधीत बालेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा (वयोगट 15 ते 18 वर्षे) पार पडणार आहे.या स्पर्धेसाठी मुंबई शहराच्या प्रतिनिधी संघात जिजामाता महिला संघाची चमकदार खेळाडू कु. प्राची राऊत हिची निवड करण्यात आली आहे. प्राची राऊत हिच्या खेळातील कौशल्य, मेहनत, आणि जिद्दीमुळे तिला ही संधी मिळाली असून, तिच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक करण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade