NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

अहमदाबाद विमान अपघातातील मृतांची संख्या 275 वर, 248 मृतदेहांची DNA चाचणी पूर्ण

अहमदाबाद विमान अपघातातील मृतांची संख्या 275 वर, 248 मृतदेहांची DNA चाचणी पूर्ण

अहमदाबाद - अहमदाबादमध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण विमान अपघातात विमानातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्याच बरोबर विमान ज्या इमारतीवर आदळले त्या मेडिकल कॉलेज हॉस्टेलमधील काही डॉक्टर्स आणि परिसरातील काही सामान्य नागरिकांचाहा मृत्यू झाला आहे. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे उपसिव्हिल अधीक्षक रजनीश पटेल यांनी सांगितले की,आजपर्यंत २४८ मृतदेहांचे डीएनए नमुने क्रॉस व्हेरिफाय झाले आहेत, त्यापैकी ६ जणांचे डीएनए जुळले आहेत. ८ जखमी अजूनही रुग्णालयात आहेत. एकाची प्रकृती गंभीर आहे. सर्वांवर उपचार सुरू आहेत.

अहमदाबादमध्ये विमान अपघातस्थळावरून आज आणखी एक मृतदेह सापडला. आज, बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातून मलबा काढताना, तो विमानाच्या शेवटी अडकलेला आढळला, जो खाली आणण्यात आला. नंतर त्याचे पोस्टमार्टम करण्यात आले. असे म्हटले जात आहे की हा मृतदेह एअर होस्टेसचा असू शकतो. दुसरीकडे, मृतांच्या डीएनए सॅम्पलिंगचे काम आजही सुरू आहे. सिव्हिल हॉस्पिटलबाहेर नातेवाईकांची गर्दी आहे. येथे कडक सुरक्षा व्यवस्था आहे. पोस्टमार्टम युनिटभोवती बाहेरील लोकांना प्रवेश बंदी आहे.

दरम्यान अपघातग्रस्त विमानाचा पायलट सुमित सभरवालने एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) ला पाठवलेला शेवटचा संदेश समोर आला आहे. ४-५ सेकंदाच्या मेसेजमध्ये, सुमित म्हणत आहे, ‘मेडे, मेडे, मेडे… जोर मिळत नाहीये. पॉवर कमी होत आहे, विमान वर उड्डाण घेत नाहीये. वाचणार नाही.’

पीटीआयच्या वृत्तानुसार, एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अहमदाबादमध्ये अपघात झालेल्या विमानाच्या उजव्या इंजिनची दुरुस्ती मार्चमध्ये करण्यात आली होती. याशिवाय डाव्या इंजिनचीही तपासणी करण्यात आली होती. जून २०२३ मध्ये त्याची पूर्णपणे तपासणी करण्यात आली होती. पुढील तपासणी या वर्षी डिसेंबरमध्ये होणार होती. विमानात जीई एरोस्पेसने बनवलेले जीएनएक्स इंजिन बसवण्यात आले होते. विमानाच्या इंजिनमध्ये कोणतीही समस्या नव्हती.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट