Breaking News
वाहतुकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी भव्य मोर्चा
मुंबई - टेम्पो चालक आर टी ओ कर्मचाऱ्यांकडून माल वाहतूकदारांना होत असलेल्या विविध त्रासाबाबत तसेच सक्तीने केल्या जाणाऱ्या दंड वसुलीबाबत विकास स्वराज पार्टीच्या वतीने 16 जून 2025 पासून आझाद मैदान येथे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात 3हजार पेक्षा जास्त माल वाहतूकदार बांधव उपस्थित राहणार आहेत.वाहतूकदारांकडून सक्तीने दंड वसुली त्वरीत थांबवावी.
शासनाकडून मोठे-मोठे व्यापारी व उद्योगाचे कर्ज माफ केले जाते. परंतु सामान्य टेम्पो चालकाकडून भरमसाठ दंड आकारून माल वाहतूकदारवर एकप्रकारे अन्याय केला जातो. जोपर्यंत या सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील अशी माहिती विकास स्वराज पार्टीचे पदाधिकारी रितेश साळेकर आणि वाहतूकदार कृती समितीचे अध्यक्ष उदय बर्गे यांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant